भारतीय वायुसेनेत सर्वात खतरनाक हॅलीकॉप्टर, चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष

 हे हॅलीकॉप्टर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

Updated: May 11, 2019, 11:14 AM IST
भारतीय वायुसेनेत सर्वात खतरनाक हॅलीकॉप्टर, चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष  title=

नवी दिल्ली : भारतीय वायुसेना स्वत:ला अधिकाधिक ताकदवान बनवत असून यात आता लढाऊ हॅलीकॉप्टर अपाचे गार्जियनचा समावेश झाला आहे. भारताने अमेरिकेशी अशा 22 लढाऊ हॅलीकॉप्टरचा करार केला आहे. याआधी भारताला चिकून हेवीलिफ्ट हॅलीकॉप्टर मिळाले आहे. बोइंग एएच-64 अपाचे हे जगातील सर्वात घातक हॅलीकॉप्टर मानले जाते. गेल्या वर्षी अमेरिकेने भारतीय वायु सेनेला सहा एएच-63 ई हॅलीकॉप्टर देण्यावर सह्या केल्या. हे हॅलीकॉप्टर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

दहशतवाद्यांशी सामना 

बोईंग निर्मित पहिले 'अपाची' हे लढाऊ हेलिकॉप्टर ( AH-64E (I) Apache Guardian ) भारतीय वायू दलाकडे आज अमेरिकेत अरिझोना इथे सुपूर्त करण्यात आले. जुलै महिन्यात 'अपाची' हे भारतात समारंभाद्वारे वायू दलात दाखल होईल. या वर्षी 9 तर 2020 च्या अखेरीस उर्वरित 13 अपाची हेलिकॉप्टर वायू दलात दाखल होणार आहेत.आपली मारक क्षमता कमी झाल्याने भारतीय वायुसेना त्रस्त आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर किमान 42 फायटर स्क्वाड्रनची गरज असताना ही ताकद कमी करुन केवळ 31 करण्यात आली आहे. पर्वत आणि जंगलांमध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हॅलीकॉप्टरची खूप मदत होणार आहे. 

भारतीय वायुसेनेकडे सध्या असलेले हॅलीकॉप्टर्स हे तीन दशकाहुनही अधिक जुने आहेत. अपाचे च्या एन्ट्रीने भारतीय वायुसेनेची ताकद वाढली आहे. अपाचे हे जगातील सर्वोत्तम हल्ला हॅलीकॉप्टर्समध्ये मोजले जाते. रॉकेट, टॅंकवर निशाणा साधणारे मिसाइल आणि जमिनीवरील विरोधकावर हल्ला करण्यास सक्षम असते. यामध्ये दोन क्रू मेंबर असतात. तसेच हे कोणत्याही हवामानात हल्ला करु शकते. 

अपाचे हॅलीकॉप्टर हे गेल्या 4 दशकांपासून अमेरिकेच्या वायु सेनेचा हिस्सा आहे. हे हेलीकॉप्टर इस्त्रायल, मिस्त्र आणि नॅदरलॅंड यांच्याकडे देखील असून ते अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज आहे.