विंग कमांडर एस धामी यांना महिला फ्लाइट कमांडर बनण्याचा मान

भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांना फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर बनण्याचा मान मिळवला आहे. 

Updated: Aug 27, 2019, 10:24 PM IST
विंग कमांडर एस धामी यांना महिला फ्लाइट कमांडर बनण्याचा मान title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : देशाच्या लेकी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावतायत. लष्करातही भारताच्या लेकी पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. अशीच एक भारताची लेक भारतीय हवाई दलात अधिकारी बनलीय. विंग कमांडर एस. धामी पहिल्या महिला अधिकारी बनल्यात. 

भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांना फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर बनण्याचा मान मिळवला आहे. ही महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. एस.धामी फ्लाइंग युनिटच्या फ्लाइंग कमांडर बनल्यात. त्यांनी हिंडन हवाई तळावर चेतक हेलिकॉप्टर युनिटच्या फ्लाइंट कमांडर म्हणून पदभार स्वीकारला आहे. 

हवाई दलात कमांड युनिटमध्ये फ्लाइट कमांडरचे पद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते. पंजाबमध्ये लुधियाणामध्ये जन्मलेल्या एस. धामी यांना बालपणापासूनच वैमानिक बनण्याची इच्छा होती. करिअरमध्ये गगनभरारी घेणाऱ्या एस.धामी या एका नऊ वर्षीय मुलाची आई आहे. धामी यांना चेतक आणि चीता हेलिकॉप्टर चालवण्याचा अनुभव आहे.