नवी दिल्ली : गेल्या ९ महिन्यांपासून कोरोना वायरस (Coronavirus) विरोधात सुरु असलेल्या लढाईत यश आल्याचे दिसतंय. तुम्ही देखील कोरोना वॅक्सिनची (Corona Vaccine) वाट पाहत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या महिन्यापर्यंत कोविड १९ वॅक्सिनचे १० कोटी लस तयार होऊन भारतात येणार आहेत.
जगातील सर्वात मोठी वॅक्सिन उत्पादक कंपनी पुण्यातील सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया या प्रोजेक्टवर ब्रिटनच्या Oxford University ची पार्टनर आहे. ऑक्सवर्ड यूनिव्हर्सिटी औषध कंपनी एस्ट्राजेनेका (AstraZeneca) सोबत मिळून वॅक्सिन बनवत आहे.
या वॅक्सिनचे १०० कोटी डोस बनवले जाणार आहेत. ज्यामध्ये ५० कोटी भारतासाठी राहतील. याचे सुरुवातीचे उत्पादन भारतासाठी असेल आणि पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला इतर दक्षिण देशांना पाठवले जाईल असे सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितले.
WHO च्या सहकार्याने Covax गरीब देशांच्या मदतीने वॅक्सिन खरेदी करत आहे. यावेळेस ४ कोटी डोस तयार झाले आहेत. वॅक्सिन शेवटच्या टप्प्यात चांगले परिणाम दिसले तर सीरम इंस्टीट्यूटला केंद्र सरकारकडून तात्काळ परवाना मिळू शकतो असे पुनावाला म्हणाले.
सर्वसाधारण व्यक्तींना परवडेल इतकी या वॅक्सिनची किंमत असेल. यासाठी सरकारशी बोलणी सुरु आहेत. वॅक्सिनच्या सुरक्षेसंदर्भात काळजी करण्याचे कारण नसल्याचे असेही पूनावाला म्हणाले. वॅक्सिनच्या दूरगामी परिणांमाबाबत २ ते ३ वर्षांनी माहिती पडेल असेही ते पुढे म्हणाले.