नवी दिल्ली : 'अन्न हे पूर्ण ब्रम्ह' हे वाक्य आपल्या संस्कृतीत फार प्रचलीत आहे. पण आपण भारत देश म्हणून बरोबर याच्याविरुद्ध दिशेने वाटचाल करीत आहोत. हे सांगण्यामागच कारणही तसच आहे.
भारतामध्ये रोज २४४ कोटींचं अन्नधान्य वाया जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. युनायटेड नेशनच्या फूड अॅण्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ) ने यासंदर्भात अहवाल दिला आहे.
ब्रिटनमध्ये लोक जेवढं अन्न खातात तेवढं अन्न भारतात वाया घालवले जात असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.
भारतामध्ये दररोज १९ कोटी ४० लाख लोकं उपाशी राहत असताना दरवर्षी ८८,८०० कोटी रूपयाचं अन्न वाया जाण ही एक गंभीर बाब आहे.