Supreme Court You Tube Channel Hacked : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं (Supreme Court of India) यूट्यूब चॅनेल हॅक (YouTube Channel Hacked) करण्यात आलं आहे. चॅनेल ओपन करताच अमेरिकन कंपनी रिपल लॅब्सचे क्रिप्टोकरन्सी XRP चा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचे सर्व व्हिडिओ गायब झाले आहेत. काही व्हिडिओची लिंक दिसत असली तरी उघडल्यावर त्यात काहीच दिसत नाहीए.
व्हिडिओच्या खाली 'ब्रॅड गार्लिंगहाऊस : रिपल रेसपॉंड्स टू द एसईसी 2 बिलिअन डॉलर फाईन ! एक्सआरपी प्राइज प्रेडिक्शन' असं लिहिण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालय घटनापीठासमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी YouTube चॅनेल वापरतं. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील सर्व प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता.
चॅनेल उघडताच दिसतायत हे व्हिडिओ
कोलकातातल्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रीमिंग सु्प्रीम कोर्टाच्या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आलं होतं. पण हा व्हिडिओ देखील गायब आहे. याशिवाय इतर सुनावणीचे व्हिडिओ देखील दिसत नाहीएत. चॅनेल कोणी हॅक केले आणि कुठून केले याची माहिती अद्याप आती आलेली नाही. याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
Supreme Court of India's YouTube channel appears to be hacked and is currently showing videos of US-based company Ripple. pic.twitter.com/zuIMQ5GTFZ
— ANI (@ANI) September 20, 2024
व्हिडिओ परत मिळवण्यासाठी प्रयत्न
तंत्रज्ञान विभागाकडून यूटयूब चॅनेलवरचे सर्व व्हिडिओ परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यूट्यूब चॅनेल कोणी हॅक केलं याची पूर्ण माहिती अद्याप हाती आलेली नाही. शुक्रवारी सकाळी चॅनेल हॅक झाल्याचं समोर आलं. सुप्रीम कोर्टाच्या आयटी टीमने हे प्रकरण नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) कडे नेलं आहे.