कोरोनाचा उद्रेक : भारतात गेल्या 24 तासांत 3 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रूग्णांची नोंद

भारतात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 

Updated: Apr 23, 2021, 12:36 PM IST
कोरोनाचा उद्रेक : भारतात गेल्या 24 तासांत 3 लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोना रूग्णांची नोंद  title=

मुंबई : भारतात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोरोनाची सखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भरतात गेल्या 24 तासांत 3 लाख 32 हजार 730 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसने तब्बल 2 हजार 263 रूग्णांचा बळी घेतला आहे.

आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील कोरोना रूग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.  कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना सर्वांनीचं कोरोना नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. 

देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 1,62,63,695 इतकी असून कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रूग्णांची संख्या 1,36,48,159   आहे. गंभीर बाब म्हणजे आतापर्यंत 1,86,920 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 24,28,616 रूग्णांवर उपचार सुरू आहे. 

राज्यात आज कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली. राज्यात आज कोरोनाचे 67,013 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 62,298 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 568 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात आता एकूण संक्रमित व्यक्तींची संख्या 40,94,840 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 6,99,858 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 33,30,747 जणांनी कोरोनावर मात केली आहे.