मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 84 हजार 601 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 3 हजार 617 रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावत असल्यामुळे दिलादायक वातावरण आहे.
India reports 1,73,790 new #COVID19 cases, 2,84,601 discharges & 3,617 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,77,29,247
Total discharges: 2,51,78,011
Death toll: 3,22,512
Active cases: 22,28,724Total vaccination: 20,89,02,445 pic.twitter.com/NgfUAOgz08
— ANI (@ANI) May 29, 2021
देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,77,29,247 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,22,512 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 22,28,724 इतकी आहे. भारतात आतापर्यंत 20,89,02,445 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.