ड्रोन हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी, गृहमंत्र्यांची माहिती

भारत आपली ताकद आणखी वाढवणार

Updated: Jul 17, 2021, 07:08 PM IST
ड्रोन हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी, गृहमंत्र्यांची माहिती title=

नवी दिल्ली : ड्रोन हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सरकार तयारी करत आहे. अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले की, भारत लवकरच ड्रोन काऊंटर तंत्रज्ञान आत्मसात करेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सांगितले की, भारत लवकरच ड्रोन काऊंटर तंत्रज्ञान आत्मसात करेल. डीआरडीओ आणि इतर संस्था स्वदेशी काउंटर ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अमित शाह यांनी शनिवारी सांगितले की, भारत लवकरच 'स्वदेशी' काउंटर ड्रोन तंत्रज्ञानामध्ये एक मोठा टप्पा गाठेल. ड्रोनविरोधी संशोधन आणि विकास प्रकल्पांना सरकारने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.

अमित शहा यांनी म्हटलं की, आम्ही लवकरच अँटी-ड्रोन तंत्रज्ञान सुधारू. गेल्या महिन्यात जम्मू हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ल्यानंतर गृहमंत्री यांनी हे विधान केले आहे.

दहशतवाद्यांनी 27 जूनच्या पहाटे जम्मू शहरातील भारतीय हवाई दलाच्या स्टेशनवर ड्रोनद्वारे दोन बॉम्ब टाकले होते. त्यात दोन जवान जखमी झाले होते. पहाटे 1.40 च्या सुमारास पहिला स्फोट झाला ज्यामुळे विमानतळाच्या तांत्रिक भागामधील इमारतीची छत कोसळली. वायुसेना या जागेच्या देखभालीची काळजी घेते. दुसरा स्फोट पाच मिनिटानंतर जमिनीवर झाला. या स्फोटांमध्ये हवाई दलाचे दोन जवान जखमी झाले.

हवाई दल प्रमुखांनी या हल्ल्यांना दहशतवादी कृत्य म्हटले आहे. अशा सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय हवाई दल आपली क्षमता आणखी मजबूत करीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. यापूर्वीही अनेक प्रकल्पांवर काम सुरू झाले आहे. काही यंत्रणा कामाला लागल्या आहेत. एअर चीफ म्हणाले की, लवकरच आमच्याकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध होईल. आम्ही या प्रकारच्या धोक्याचा सामना करण्याचे मार्ग शोधू. भारतीय सैन्याच्या तळावर हा पहिला ड्रोन हल्ला होता.