मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर सोन्या-चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर सोन्या-चांदीच्या दागिन्यातील गुंतवणूक वाढली आहे. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, कारण अर्थ मंत्रालयाला देखील सुरूवातीला असंच वाटलं होतं.
तर झालं असं नोटबंदीनंतर अनेक ज्वेलर्स विक्रेत्यांनी करोडोंचा अनअकाऊंटेड पैसा बँकेत जमा केला. तसेच एवढी मोठी रक्कम टॅक्स रिटर्नमधूनही लपवण्यात आली. याबाबत आयकर विभागाने विचारणा केल्यानंतर सर्जिकल स्ट्राइकचा परिणाम झाल्याचं सांगितलं. सर्जिकल स्ट्राइकमुळे आमच्या उत्पन्नात वाढ झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र याचं पुरेसं पटणार उत्तर विक्रेते देऊ शकले नाहीत.
अर्थ मंत्रालयाच्या स्पेशल टीमने डेटा एनालिसिस करून या ज्वेलर्स विक्रेत्यांची माहिती काढली. यातून समोर आलेली माहिती ही अतिशय धक्कादायक आहे. गेल्यावर्षांच्या तुलनेत 93,648% हो अगदी बरोबर 93,648 टक्के रोकडमध्ये वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर या रोकड रक्कमेचा उल्लेख 2017-18 मध्ये भरलेल्या कर परतावा (रिटर्न) मध्ये देखील नाही.
गुजरातमध्ये 2016 साली 11 आणि 12 व्या महिन्यात 4,14,93,000 रुपये एका खात्यात जमा करण्यात आहे. त्याआधीच्या वर्षी फक्त 44,260 रुपये खात्यात जमा होते. तसेच नोटबंदीच्या दरम्यान काही लोकांनी भाऊबंदकीमुळे लोन दिले. यामध्ये असुरक्षित लोनची संख्या वाढली. जोपर्यंत आयकर विभागाची यावर नजर पढत नव्हती तोपर्यंत या साऱ्या गोष्टी ठिक होत्या. मात्र आयकर विभागाच्या नजरेतून ही गोष्ट सुटलेली नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॉडस ऑपरेंडीमध्ये विक्री वाढवणे, अनोळख्या व्यक्तींकडून लोन घेणे, नोटबंदीच्या अगोदर उधारीत सोन्या-चांदीची विक्री करणे अशा गोष्टी दाखवल्या.