जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा, अंगावर ट्रेन गेली तरी ती मोबाईलवर बोलत होती, VIDEO व्हायरल

तिच्या अंगावरुन ट्रेन गेली पण तिने मोबाईलवर बोलणं सोडलं नाही

Updated: Apr 14, 2022, 05:00 PM IST
जीवापेक्षा मोबाईल महत्वाचा, अंगावर ट्रेन गेली तरी ती मोबाईलवर बोलत होती, VIDEO व्हायरल

Viral Video : आजच्या काळात मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलशिवाय काहीही करणं कठीण होत चालले आहे. विशेषत: तरुणाईत मोबाईलच भलतंच आकर्षण आहे. तासनतास फोनवर बोलण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की आपल्या आजू बाजूला काय घडतंय याचंही भान रहात नाही. 

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुलगी मोबाईलवर बोलण्यात इतकी व्यस्त की तिच्या अंगावरुन ट्रेन गेल्यानंतरही तिने मोबाईलवर बोलणं सोडलं नाही.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसंतय की एक मुलगी मोबाईलवर बोलत रेल्वे रुळ ओलांडतेय. ती मोबाईलवर बोलण्यात इतकी व्यस्त असते की तिला समोरून येणारी ट्रेन दिसलीच नाही. पण ती सावध होते आणि रेल्वे रुळावर झोपून घेते. यानंतर संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरुन जाते. पण यानंतर जे घडतं ते जास्त धक्कादायक आहे. 

ट्रेन गेल्यानंतर ती मुलगी आरामात उठते आणि काही झालंच नाही या अविर्भावत पुन्हा मोबाईलवर बोलू लागते. मोबाईलवर बोलतच ती प्लॅटफॉर्मवर चढताना दिसत आहे. जीवापेक्षाही तिला मोबाईलवर बोलणँ जास्त महत्वाचं वाटतंय. प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी तिच्या निष्काळजीपणाबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्याने मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे फोनवर गॉसिप जास्त महत्त्वाचं'. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. 21 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटरवर आतापर्यंत 91 हजारांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तसंच कमेंटमध्ये अनेकांनी या मुलीला सुनावलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x