COWIN अॅपचा डेटा लीक? हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात

भारतातील हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा, ज्यात त्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते आणि कोविड चाचणी निकालांचा समावेश आहे

Updated: Jan 21, 2022, 09:21 PM IST
COWIN अॅपचा डेटा लीक? हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात title=

नवी दिल्ली : भारतातील हजारो लोकांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते आणि कोविड चाचणी निकालांसह त्यांचा वैयक्तिक डेटा सरकारी सर्व्हरवरून लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लीक झालेला डेटा एका वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. एका सायबर गुन्हेगाराने 20,000 हून अधिक लोकांचा वैयक्तिक डेटा असल्याचा दावा केला आहे. यात नावं, मोबाईल क्रमांक, पत्ते आणि चाचणीचे निकाल या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

सायबर तज्ज्ञांचा इशारा
सायबर सुरक्षा तज्ञ राजशेखर राजहरिया यांनी ट्विट केले की '#Covid19 #RTPCR चाचणी निकाल आणि #Cowin डेटा यासह रुग्णाचं नाव, मोबाइल नंबर, पॅन, पत्त्यासहीत PII एका सरकारी CDN द्वारे सार्वजनिक होत आहे. रुग्णांचा डेटा #Darkweb वर लिस्टेड आहे.

डॉक्टरांनी केलं वृत्ताचं खंडन
या वेबसाईटलर लीक झालेला डेटा को-विन पोर्टलवर अपलोड करायचा होता. पण Cowin प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी Cowin पोर्टलचा डेटा लीक झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. डॉ आर एस शर्मा म्हणाले, 'Cowin पोर्टलच्या डेटा लीकचे हे प्रकरण आहे असं वाटत नाही. कारण Cowin पोर्टलवर कोणाचा पत्ता किंवा कोविड अहवाल अपलोड केला जात नाही. मात्र खबरदारीच्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून तपासानंतरच याबाबत अधिक माहिती सांगता येईल.