नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणावर सर्जरीसाठी आवश्यक उपकरणांची निर्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून केली जाते. पाकिस्तानच्या या भागातून सर्जरीची उपकरणे जगातील अनेक देशांमध्ये पाठवली जातात. विशेष म्हणजे फाळणीच्या आधीपासूनच पंजाब प्रांत सर्जरीच्या उपकरणांच्या निर्मितीत अग्रेसर आहे हे विशेष.
सर्जरीच्या उपकरणांसाठी भारत मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानवर अवलंबून आहे. जरी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून मागील वर्षी 'सर्जिकल स्ट्राईक' केले असले तरी.
पाकिस्तानमध्ये तयार केली जाणारी सर्जरीची उत्पादने भारतातून आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये निर्यातदेखील केली जातात. भारत-पाकिस्तानमधील राजकीय संबंध बिघडले, तरीही भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सर्जरीच्या उपकरणांची आयात करतो. कात्री, नीडल होल्डर, रिट्रॅक्टर अशी सर्जरीसाठी आवश्यक असणारी उपकरणे पाकिस्तानकडून आयात केली जातात.