हैदराबाद : लडाखच्या GalwanValley गलवान खोऱ्यामध्ये झालेली हिंसक झडप तणावाच्या परिस्थितीत आणखी भर टाकून गेली. चीनसोबतच्या या संघर्षात भारतीय लष्करातील कर्नल संतोष बाबू शहीद झाले. त्यांच्या या बलिदानाला साऱ्या देशानं मानवंदना वाहिली. या घटनेची माहिती जसजशी सोशल मीडियावर सर्वांपर्यंत पोहोचली तसतसं शहिद झालेल्या जवानांप्रती साऱ्या देशातून हळळहळ व्यक्त करण्यात आली. Fact Checker Fact Crescendo असा दावा करतात की, व्हायरल झालेला हा फोटो शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा नाही.
काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये एक असा प्रसंग टीपल्याचं पाहायला मिळालं जो पाहून मनात कालवाकालव झाल्यावाचून राहणार नाही. अनेकांनीच हा फोटो शेअर करत त्याच्याप्रती आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
ही मुलगी शहीद कर्नल बाबू यांची कन्या असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फोटो शेअर केला. पण, ही त्यांची मुलगी नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमागचं सत्य आता समोर आलं आहे.
दरम्यान, कित्येकांनी शहिद बाबू यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती करत या संकटसमयी सारा देश त्यांच्या बाजुनं असल्याचं म्हणत देशासाठी प्राण त्यागणाऱ्या या शहिदाच्या कुटुंबाला आधार दिला.
शहीद कर्नल संतोष बाबूंच्या आईला 'या' गोष्टीचं जास्त दु:खं
कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू हे मुळचे तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील. त्यांच्या पश्चात पत्नी, नऊ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. वीरमरण आलेल्या आपल्या पोटच्या मुलाच्या जाण्याचं दु:ख बाबू यांच्या आईला असलं तरीही त्यांनी देशासाठी प्राण त्यागलाचा या मातेला अभिमान आहे. त्यामुळं बाबू यांच्यासमवेत त्यांच्या या धाडसी कुटुंबालाही सलाम.