Cheating With Partner: आपल्या पार्टनरला धोका देणं ही गोष्ट चुकीची आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एक सर्व्हेक्षणानुसार, 23 टक्के लोकं कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या पार्टनरला धोका देत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बेडबाइबल रिसर्च सेंटर 2023 च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय 14 टक्के लोकांनी सध्याच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचं मान्य केलं आहे. मुख्य म्हणडे यामध्ये 21 टक्के पुरुषांचा समावेश आहे, तर 7 टक्के महिलांनी याची कबुली दिलीये.
भारतासह आशियाई देशांबद्दल बोलायचं झालं तर, 10 पैकी 7 पुरुष आणि 6 महिला जर आपण पकडले जाणार नसू तर जोडीदाराला फसवण्यासाठी करण्यास तयार असतात. दुसरीकडे 17 टक्के लोकांना त्यांच्या जोडीदाराने फसवणूक केल्याबद्दल पकडलं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी फसवणूक झाल्याची सुमारे २५ टक्के प्रकरणं आढळून आली आहेत. 60 टक्के प्रकरणे जवळच्या मित्र किंवा सहकाऱ्यापासून सुरू होत असल्याचा खुलासा धाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 49.8 टक्के लोक आपण पार्टनरला धोका दिलाय हे स्वीकारत नाहीत.
एका अभ्यासानुसार असं समोर आलं होतं की, भारतातील सरासरी 19-29 वयोगटातील महिला पुरुषांपेक्षा फसवणूक करतात. या वयातील 40 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केली तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 21 टक्के असल्याचं समोर आलं होतं. या वयात माणसांच्या हृदयात, मनात आणि शरीरात अनेक बदल होत असतात, त्यामुळे या व्यक्ती असं पाऊल उचलतात.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात आपल्या पार्टनरसोबत फसवणूक करण्याच्या बाबतीत बंगळुरू आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि त्यानंतर कोलकाता आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ऑफिसमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये महिला आणि पुरुष एकत्र काम करतात. रात्री काम करताना स्त्री-पुरुषांना त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल अधिक सहानुभूती असते आणि ते एकमेकांच्या जवळ येऊ लागतात.
या अहवालात नमूद करण्यात आलंय की, 55 टक्के भारतीय त्यांच्या जोडीदाराची एकदा तरी फसवणूक करतात. ही फसवणूक केवळ विवाहबाह्य संबंध नसून जोडीदारापासून लपवून ठेवलेला भावनिक किंवा आर्थिक व्यवहारही असू शकतो. तर 70 टक्के भारतीय महिला आपल्या जोडीदाराला माफ करतात आणि त्यांना सुधारण्याची संधी देतात.