VIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...

नेहा चौधरी | Updated: Feb 10, 2024, 09:15 AM IST
VIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते... title=
2 trains came face to face on the same track and then what happened next viral video on Internet trending today

Viral Video : प्रत्येक जणाने कधी ना कधी ट्रेनने प्रवास केला आहे. लांब पल्ल्याचा प्रवासासाठी सर्वसामान्यांना ट्रेनचा प्रवास हा जलद आणि सोयीचा पडतो. त्यामुळे भारतात दररोज असंख्य लोक ट्रेनने प्रवास करत असतात. भारतात या ट्रेनच्या वाहतुकीसाठी कानाकोपऱ्यात रेल्वे ट्रॅकचे जाळे पसरले आहेत. एका स्टेशनवरुन दुसऱ्या स्टेशनवर जाण्यासाठी रेल्वे या ट्रॅकवरुन धावत असतात. एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंतचा प्रवास रेल्वे अनेक ट्रॅकवरुन धावत असते. अशाच तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास आणि निसर्गाचा आनंद घेत असताना अचानक दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर समोरासमोर आली तर...(2 trains came face to face on the same track and then what happened next viral video on Internet trending today)

पुढे जे घडलं ते...धक्कादायक व्हिडीओ

कधीही एकाच ट्रॅकवर दोन विरुद्ध दिशेने रेल्वे धावत नाही. याची विशेष काळजी घेण्यात येते. पण सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन एकमेकांच्या समोरासमोर आल्यात...सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरील अकाऊंट @saurabhyatra यावरील हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. 

या अकाऊंटवरील व्हिडीओ प्रथमदर्शी पाहिल्यास दोन ट्रेन एकमेकांच्या समोर आल्यात आहेत असं जाणवतं. पण नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, त्या दोन ट्रेन एकाच ट्रॅकवर एकमेकांच्या समोर थांबल्या आहेत. त्यातील एक ट्रेन ही मालगाडी आहे. पुढच्या ट्रेनचं इंजिन हे खरं तर मागचं इंजिन आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं त्या ट्रेन एकमेकांच्या समोरासमोर आल्या आहेत. 

हा व्हिडीओ पाहून नेटकरी तुफान कमेंट्स करत आहेत. एका युजर्सने सांगितलं आहे की, बँकर लोकोमोटिव्ह आहे याचाअर्थ ट्रेनच्या मागे बसवलेलं इंजिन आणि ट्रेनला धक्का देण्यास मदत करत असते. तर एकाने हा व्हिडीओवर म्हटलं आहे की. हा बँकर लोकामोटिव्ह नाही आहे. बँकर लोकामोटिव्ह मध्ये ट्रेन शंट केली जाते. याचा अर्थ असा होतो की, ट्रेन एका ट्रॅकवरुन दुसऱ्या ट्रॅकवर नेली जाते. 

हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपले आपले तर्क लावत आहेत. नेमकं हे काय प्रकरण आहे आणि हा व्हिडीओ कुठला आहे ज्याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. पण हे दृश्यं पाहून नेटकरी मात्र अवाक् झाले आहेत.