Income Tax Return भरण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स तुम्हाला माहितीय का?

आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. 

Updated: Jun 30, 2022, 07:23 PM IST
Income Tax Return भरण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स तुम्हाला माहितीय का? title=

मुंबई : आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. तुम्ही घरबसल्या सहजपणे इन्कम टॅक्स भरू शकता. जर तुम्हाला स्वतःहून आयकर रिटर्न भरायचे असेल, तर तुम्ही आधार, पॅन, बँक खाते क्रमांक, गुंतवणुकीचे तपशील आणि त्याचे पुरावे/प्रमाणपत्र, फॉर्म 16, फॉर्म 26AS यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह आयकर भरू शकता.

आयटीआर फॉर्मचे ७ प्रकार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्या श्रेणीत फॉर्म भरायचा आहे हे आधी कळले पाहिजे. पगारदार वर्गातील लोक आयकर रिटर्न कसे भरू शकतात ते जाणून घेऊयात. 

ITR भरण्याच्या सोप्या स्टेप्स

  • तुम्ही प्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/ login पर जाएं.
  • आता येथे तुम्ही तुमचा लॉगिन आयडी टाका आणि पासवर्ड टाका.
  • जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर Forget Password या पर्यायावर जाऊन नवीन पासवर्ड तयार करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • आता तुम्ही ई-फाईलचा पर्याय निवडा आणि तेथे आयकर भरण्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुम्ही आर्थिक वर्ष निवडा.
  • आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाइन पर्याय निवडाल, त्यानंतर वैयक्तिक पर्याय निवडा.
  • आता तुम्हाला ITR-1 आणि ITR-4 असे दोन पर्याय दिसतील
  • तुम्ही पगारदार वर्ग असाल तर त्यात ITR-1 निवडा.
  • आता तुमच्या सिस्टमवर एक फॉर्म उघडेल, तो भरण्यासाठी 139(1) मूळ रिटर्न निवडा.
  • आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल, जो नीट भरावा, यासोबतच तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहितीही भरावी लागेल.
  • तुम्ही फॉर्ममध्ये ऑफलाइनचा पर्याय निवडल्यास, फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला संलग्न फाइलचा पर्याय दिसेल.
  • फॉर्म भरल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन पडताळणी निवडा, त्यानंतर तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला जाईल.