आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना दिला परतावा, आला का ते असे तपासा

Income Tax Refund:  आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना परतावा जारी केला आहे.

Updated: Jan 14, 2022, 09:32 AM IST
आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना दिला परतावा, आला का ते असे तपासा title=

मुंबई : Income Tax Refund: करदात्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी करदात्यांना परतावा दिला आहे. प्राप्तिकरदात्यांना आतापर्यंत 1.54 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. CBDT नुसार, 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 पर्यंत 1.59 कोटी करदात्यांनी भरले आहे.

आयकर विभागाने सांगितले की, 1.56 कोटी प्रकरणांमध्ये, 53,689 कोटी रुपयांचा आयकर परत केला गेला आहे. तर 2.21,976 प्रकरणांमध्ये 1,00,612 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परत केला गेला आहे.

1.59 कोटी करदात्यांनी भरले पैसे

प्राप्तिकर विभागाने ट्विट केले की 'केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल  2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59  कोटी करदात्यांना 1,54,302  कोटींहून अधिकचा परतावा जारी केला आहे.' आकलन वर्ष 2021-22 मध्ये ( 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 1.20 कोटी परतावा) 23,406.28 कोटी रुपये आहेत. 

रिफंड आला हे कसे चेक करायचे?

तुमचा रिफंड अजून आला नसेल, तर तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवरुन तुमच्या रिफंडची स्थिती तपासू शकता. तुम्ही तुमच्या पॅन आणि लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे या स्टेप्स फॉलो करुन हे काम सहजपणे करु शकता.

- यासाठी, Incometax.gov.in वर जा आणि तुमच्या पॅन आणि पासवर्डसह लॉग इन करा.
- त्यानंतर, 'ई-फाइल' पर्यायावर क्लिक करा आणि 'इन्कम टॅक्स रिटर्न' निवडा.
- त्यानंतर 'व्ह्यू फाइल रिटर्न' निवडा.
- या विभागासाठी दाखल केलेला नवीनतम ITR तपासा.
- नवीन फाइल ITR AY 2021-22 साठी असेल.
- तुम्ही येथे 'तपशील पाहा' पर्याय निवडल्यास तुम्हाला कर परतावा जारी करण्याची तारीख, परतावा देण्याची रक्कम आणि या मूल्यांकन वर्षासाठी कोणत्याही परताव्यासाठी मंजुरीची तारीख दिसेल.

परतावा न मिळण्याचे कारण काय असू शकते?

रिफंड न मिळाल्यास, सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटवर तुमच्या आयकर खात्यात लॉग इन करा. नंतर My Accounts वर क्लिक करा आणि नंतर Refund आणि नंतर Demand Status वर क्लिक करा. यानंतर, मूल्यांकन वर्ष टाका. ज्यासाठी तुम्हाला परतावा जाणून घ्यायचा आहे. असे केल्याने परताव्याशी संबंधित माहिती पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला रिफंड न पाठवल्याची माहिती मिळेल.

बँक खाते क्रमांक काळजीपूर्वक भरा

परतावा भरताना तुम्हाला तुमचे बँक खाते विचारले जाते. जेणेकरून परतावा थेट त्याच खात्यात जमा होईल. आजकाल बँक खाते आणि तुमचे रिटर्न आधीच जोडलेले आहेत. तुमच्याकडे आधीपासून लिंक केलेले खाते नसल्यास, सर्वप्रथम ते सत्यापित करणे आहे. यानंतर ई-व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल. ई-सत्यापनाची योग्य पद्धत निवडा. विनंती सबमिट करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC)/आधार ओटीपी येईल तो भरा. रिफंड रि-इश्यू विनंती सबमिट केल्यानंतर, एक संदेश येईल ज्याचा अर्थ तुमचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे. तुम्हाला लवकरच परतावा दिला जाईल.