Global Leader Ranking: जगभरात लोकप्रिय नेता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी त्यांची बादशाहत कायम ठेवली आहे. जगभरात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( PM Narendra Modi ) नावाचा डंका वाजला आहे. पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते. अमेरिकेची फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' च्या ग्लोबल रेटिंग मध्ये पंतप्रधान मोदींना 76 टक्के लोकांनी लोकप्रिये नेता म्हणून मत दिलं आहे.
'मॉर्निंग कन्सल्ट' या सल्लागार कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी 76 टक्के रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय. यापूर्वीच्या 'ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकर'वर 76 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींना ( PM Narendra Modi ) लोकप्रिय मानलं होतं. यावेळी 18 टक्के लोकांनी मोदींचं नेतृत्व नाकारलं होतं.
या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल ( Andrés Manuel López Obrador ) यांना सर्वाधिक म्हणजेच 66 टक्के लोकांनी पसंती दिली. यावेळी मात्र 29 टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे. याआधीच्या रेटिंगमध्ये मॅन्युएल ( Andrés Manuel López Obrador ) तिसऱ्या स्थानावर होते. यंदाच्या वेळी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झालेली दिसून येतेय. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बुर्सेट 58 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लोकप्रिय नेत्यांच्या यादीत टॉप 5 मध्येही स्थान मिळालेलं नाही. या रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना 37 टक्के लोकांनी पसंती दिलीये. यापूर्वी समोर आलेल्या रँकिंगमध्ये त्यांना 40 टक्के लोकांनी पसंती दिली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे रेटिंग 31 टक्के आहे, यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे रेटिंग 25 टक्के आहे.