चिकन खाणारे सावध व्हा! खाण्याच्या पदार्थात ग्राहकाला सापडली धक्कादायक गोष्ट

इंस्टाग्रामवर महिलेनं तिच्या मिलशी संबंधीत एक धक्कादायक फोटो पोस्ट केला आहे.

Updated: Dec 24, 2021, 04:50 PM IST
चिकन खाणारे सावध व्हा! खाण्याच्या पदार्थात ग्राहकाला सापडली धक्कादायक गोष्ट title=

मुंबई : मांसाहारी लोकांना चिकन खायला फार आवडते. अशा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन खातात आवडते. केएफसी फूड कंपनी देखील विविध प्रकारचे चिकन डिश विकते. त्यामुळे मांसाहार करणारे लोक चिकन खाण्यासाठी केएफसीमध्ये जातात. आपण बऱ्याच पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याते ऐकले आहे. परंतु आपण मोठमोठ्या कंपनींवरती डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. कारण आपण त्यासाठी जास्त पैसे मोजतो, मग चांगल्या फुडची अपेक्षा तर आपण करणारच.

परंतु तुम्हाला त्यामध्ये जर नको ती गोष्ट भेसळ झालेली पाहायला मिळाली तर? तुमचं मांसाहार करण्याचं तर विश्वास तर उडेलच, शिवाय कंपनीवरुन विश्वास देखील उडेल.

एका महिले सोबत असाच एक प्रकार घडला आहे, ज्यामध्ये तिला मांसाहारात अशी गोष्ट आढळली, जी पाहून ती थक्क झाली. या महिलेनं केएफसीमधून ही ऑर्डर केली होती आणि या मोठ्याकंपनीकडून ऐवढी मोठी चूक घडेल असं तिला वाटलं नव्हतं.

महिलेला तिच्या KFC हॉट विंग्सच्या बॉक्समध्ये कोंबडीचे पूर्ण डोके दिसले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. या मीलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि यामध्ये त्या कोंबडीचे डोके तुम्ही निट पाहू शकता. यामध्ये कोंबडीचे पूर्ण डोके, डोळे आणि चोच दिसत आहे.

KFC हॉट विंग्सच्या बॉक्समध्ये, महिलेला पिठात तळलेले चिकनचे पूर्ण डोके मिळते. फोटोमध्ये ते खूपच विचित्र दिसत असल्याचे दिसून येते. KFC ग्राहक गॅब्रिएलने ट्विकेनहॅम, साउथेस्ट लंडन येथील KFC फेल्थम कडून ऑर्डर दिली होती.

तिने इंस्टाग्रामवर महिलेनं तिच्या मिलशी संबंधीत एक धक्कादायक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिले होते, 'मला माझ्या हॉट विंग्ज मीलच्या ऑर्डरमध्ये फ्राइड चिकन हेड सापडले. त्यामुळे मला माझ्या जेवणाचा पूर्ण आनंद घेता आला नाही.'

चिकन हेडच्या व्हायरल फोटोवर केएफसीची प्रतिक्रिया

मीडिया रिपोर्टनुसार, KFC ने यावर ट्विटर करत सांगितले की, या घटनेने आम्हाला ही धक्का बसला आहे आणि ग्राहकाने दिलेल्या रिव्ह्यूला 'मोस्ट जेनर टू-स्टार रिव्ह्यू' म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे केएफसीने सांगितले. KFC ने हवाला देत म्हटले आहे की, 'आम्ही या फोटोने खरोखरच हैराण झालो आहोत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही गॅब्रिएलच्या संपर्कात आहोत. हे सर्व कसे घडले याची आम्ही चौकीशी करत आहोत.'