Big news : जूनच्या 1 तारखेपासून बदलणार मोठे नियम; पैशांशी थेट संबंध, आताच पाहा

तयार राहा मोठ्या बदलांसाठी   

Updated: May 30, 2022, 07:43 AM IST
Big news : जूनच्या 1 तारखेपासून बदलणार मोठे नियम; पैशांशी थेट संबंध, आताच पाहा  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कोणत्याही महिन्याच्या सुरुवातीआधी त्या महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांवर आपला डोळा असतो. पण, सुट्ट्यांपेक्षाही महत्त्वाची बाब आहे, ज्यावर तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. कारण, ही बाब थेट तुमच्या पैशांशी जोडली गेली आहे. चला तर मग, जाणून घेऊया 1 तारीखपासून नेमकं काय बदलणार त्यावर... (Important rules will change from 1st june bank home loan cylinder and more )

वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स 
जूनच्या पहिल्याच दिवसापासून दुचाकी, चारचाकी आणि मोठ्या वाहनांवर आकारला जाणारा थर्ड पार्टीविमा महागणार आहे. परिणामी वाहनांच्या दरांवर याचे परिणाम दिसून येतील. 150 ते 350 सीसी वाहनांवर 1366 रुपयांचा प्रिमियम असेल. तर, 350 सीसीहून अधिकच्या वाहनांचं प्रिमियम 2804 रुपये इतकं असेल. 

घरगुती सिलिंडरचे दर 
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही जून महिन्यात बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याला कंपन्यांकडून गॅसच्या दरांची माहिती देण्यात येते. अनेकदा तर महिन्याला दोनदा हे दर बदलतात. या महिन्यात दरात वाढ किंवा घट असे दोन्ही घटक अपेक्षित आहेत. 

स्मॉल सेविंग्स स्किमच्या व्याजदरात बदल 
PPF, NSC, KVP आणि सुकन्या समृद्धी अशा लघू बचत योजनांच्या व्याजदरात येत्या महिन्यापासून बदल होणार आहेत. 30 जूनपासून हे नवे व्याजदर लागू असतील. दर तीन महिन्यांनी या योजनांचे व्याजदर बदलण्यात येतात. 

गोल्ड ह़ॉलमार्किंग 
जून महिन्यापासून हॉलमार्किंगचा नवा टप्पा सुरु होत आहे. याअंतर्गत 32 नव्या जिल्ह्यांमघ्ये नवी हॉलमार्किंग केंद्र खुली करण्यात येणार आहेत. परिणामी सर्व देशभरात आता हॉलमार्कचेच दागिने विकले जाणार आहेत. 

GMail चे नियमही बदलणार 
1 जूनपासून तुम्हाला जीमेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या गुगल फोटोमध्ये अमर्याद फोटो अपलोड करता येणार नाहीत. गुगलकडून वापरकर्त्यांना 15 जीबीचा स्पेस दिला जाणार आहे. यामध्ये फोटो आणि ईमेलही समाविष्ट आहेत. परिणामी तुम्हाला याहून जास्त स्पेस हवा असल्यास जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.