इल्कर आयसी यांनी एअर इंडियाच्या CEO आणि MD होण्यास दिला नकार, होत होता विरोध

इल्कर आयसी (Ilker Ayci) यांनी एअर इंडियाच्या (AIR INDIA) सीईओ आणि एमडी (CEO and MD) होण्यास इन्कार केला आहे.  

Updated: Mar 1, 2022, 02:40 PM IST
इल्कर आयसी यांनी एअर इंडियाच्या CEO आणि MD होण्यास दिला नकार, होत होता विरोध title=

मुंबई : इल्कर आयसी (Ilker Ayci) यांनी एअर इंडियाच्या (AIR INDIA) सीईओ आणि एमडी (CEO and MD) होण्यास इन्कार केला आहे. टाटा सन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीचे इल्कर आयसी यांनी टाटाच्या एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी होण्यास नकार दिला आहे. खरे तर त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी भारतात तीव्र विरोध होत होता. (Turkey’s Ilker Ayci declines Air India CEO, MD offer after opposition to appointment in India)

आरएसएसने विरोध केला होता

दरम्यान, विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर्थिक शाखेने देखील भारत सरकारकडे मागणी केली होती की इल्कर आयसी यांची भारताची माजी सरकारी एअरलाइन एअर इंडियाच्या सीईओपदी नियुक्ती करू नये. टाटा समूहाने एअर इंडियाचे  (AIR INDIA) ताबा घेतल्यानंतर एअर इंडियाने अलीकडेच इल्कर आयसी यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्याबाबत घोषणा केली होती

इल्कर आयसी हे 1994 मध्ये इस्तंबूलचे महापौर असताना रिसेप तय्यप एर्दोआन यांचे सल्लागार होते. याआधी इलकर हे आयसी तुर्की एअरलाइन्सचे सीईओही होते.

म्हणून मी दिला नकार - इल्कर

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इल्कर आयसीने सांगितले की, टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये माझी नियुक्ती फेब्रुवारीच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आली होती. माझा कार्यकाळ 1 एप्रिलपासून सुरू होणार होता. माझी नियुक्ती जाहीर झाल्यापासून मी भारतीय माध्यमांच्या एका विभागातील बातम्यांचे बारकाईने निरीक्षण करत होतो. एका भारतीय माध्यमांने माझ्याबाबत वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करताना पाहत होतो. एक व्यावसायिक नाते म्हणून मी नेहमीच व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला माझ्या कुटुंबाच्या आनंदाची आणि आरोग्याची काळजी आहे. या सर्व गोष्टी बघून मी ठरवले की ही ऑफर स्वीकारणे सन्माननीय नाही.

एअर इंडिया नावाची प्रतिष्ठित विमान कंपनी

इल्कर आयसी हे तुर्की एअरलाइन्सचे अध्यक्ष आहेत आणि ते 01 एप्रिलपासून एअर इंडियाचा कार्यभार स्वीकारणार होते. ऑफर मिळाल्यानंतर त्यांनी एअर इंडियाला आयकॉनिक एअरलाइन म्हटले. मात्र भारतात याला सातत्याने विरोध होत होता. त्यांचा विमान वाहतूक क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता टाटाला त्यांच्या नवीन एअरलाइनसाठी नवीन सीईओ शोधावा लागणार आहे.