आज पार पडणार IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा

२०१४ पासून या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. 

Updated: Feb 17, 2019, 02:28 PM IST
आज पार पडणार IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा  title=

नवी दिल्ली : IIMC म्हणजेच इंडियन इंस्टिस्टय्ट ऑफ मास कम्युनिकेशनतर्फे आयोजित करण्यात येणारा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार, १७ फेब्रुवारीला पार पडणार आहे. आयआयएमसीच्या मुख्यालयात हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय सभेनंतर देश आणि जगभरातील पंधराहून अधिक शहरांमध्ये हा समारंभ पार पडणार आहे. २०१४ पासून सुरु झालेल्या या पुरस्कार सोहळ्यांची लोकप्रियता पाहता पाहता वाढत गेली आणि विविध शहरांमध्ये या समारंभांचं आयोजन करण्यात येऊ लागलं. 

विविध शहरांच्या या यादीत मुंबई, भुवनेश्वर, लखनऊ, पाटणा, जयपूर, भोपाळ, रायपूर, कोलकाता, चंडीगढ या शहरांचा समावेश आहे. तर, सिंगापूर आणि बांग्लादेश या देशांचाही यात समावेश आहे. या वार्षिक समारंभात पत्रकारिता, डिजिटल पत्रकारिता, जाहीरात, जनसंपर्क, ब्रँडिंग या क्षेत्रांतील ३५ जणांना IFFCO IIIMCAA Awards 2019 हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ज्यामध्ये विजेत्यांना २१ ते ५१ हजार रुपयांपर्यंतची रोख रक्क बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे. या समारंभानंतर IIMCच्या मुख्यालयात एका मुशायऱ्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध शायर वसिम बरेलवी आणि नवाज देवबंदी यांचा सहभाग असणार आहे.