असा विचार करणाऱ्या महिलांची मुलं शाळेत असतात टॉपर - रिसर्च

आईच्या 'या' गुणाने मुलांमध्ये प्रगती पाहायला मिळाली 

Updated: Jul 5, 2021, 09:11 AM IST
असा विचार करणाऱ्या महिलांची मुलं शाळेत असतात टॉपर - रिसर्च  title=

मुंबई : मुलांच्या आयुष्यावर पालकांचा मोठा प्रभाव असतो. मुलांना काही गुण, सवयी ही जन्मतःच मिळतात. मुलं कायमच पालकांना बघून शिकत असतात. हल्लीच जनरल फ्रंटियर्स ऍण्ड सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मोठा खुलासा झाला होता. मुलांना आपल्या आईकडून एक खास गोष्ट मिळते. ज्याचा मुलांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. 

आईच्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव मुलांच्या परफॉर्मन्सवर होत असतो. एका अभ्यासात हा मोठा खुलासा झाला आहे. अभ्यासानुसार आईच्या 'लोकस ऑफ कंट्रोल' याचा प्रभाव मुलांवर होत असतो. 

काय असतं लोकस ऑफ कंट्रोल?

पर्सनॅलिटी स्टडीजमधील 'लोकस ऑफ कंट्रोल' हा एक महत्वाचा हिस्सा आहे. यामध्ये व्यक्तींना असं वाटतं की,'आपल्या आजूबाजूंच्या घटनांना आपण कंट्रोल करू शकतो.' लोकस ऑफ कंट्रोल दोन भागांमध्ये विभागलं आहे. 

आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते आपल्या कामामुळे किंवा आपल्यामुळे असतं. इंटरनल लोकसमध्ये अशा गोष्टींचा उल्लेख केला आहे. जर मुलं अभ्यासात नापास जरी झाली तरी ते त्याकरता स्वतःला जबाबदार धरतात. यानंतर ते अधिकचा वेळ हा अभ्यासासाठी देत असतात. 

एक्सटर्नल लोकसमध्ये एखादी व्यक्ती नशिब, वेळ, भाग्य आणि इतर गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतात. त्याला या गोष्टीवर विश्वास ठेवावसा वाटतो की, बाहेरील शक्ती आपल्याला कंट्रोल करत असते. अशावेळी परिक्षेत नापास झाल्यास आपली चुकी नाही असं मानलं जातं. 

अभ्यासात काय आलं समोर?

 

गरोदर महिलांचा आपल्या आयुष्याबद्दल काय विचार आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला. यामध्ये 1600 गर्भवती महिला सहभागी असतात. ज्या महिला आपल्या आयुष्यावर आपला कंट्रोल असल्याचं मान्य करतात. त्यांची मुलं गणित, विज्ञान आणि गणितं सोडवण्यात चांगलीच हुशार असतात.  

अशा पद्धतीने काम करते ही गोष्ट 

या अभ्यासात समोर आलं आहे की,'महिला कायमच आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत असतात. ती आपल्या मुलांना निरोगी आहार देत असते. ज्यामुळे मुलांचा मेंदूचा विकास चांगला झाला. आई कायमच आपल्या मुलांना गोष्टी वाचून दाखवते. तसेच मुलांच्या शाळेतील काम आणि ग्रेडमध्ये अधिक रस घेते.'

पेरेंटिंग स्कूलमध्ये सुधार 

आपण आपल्या पालकत्वाची कौशल्ये सुधारू शकता ज्याचा मुलावर सकारात्मक परिणाम होईल. मुलांशी बोलत असताना सावधगिरी बाळगा कारण त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम होत आहे.