तुमच्या खात्यात कॅश डिपॉजिट केल्यावरही कापले जाणार पैसे, पण का? जाणून घ्या कारण

एकदा पैसे जमा केल्यानंतर खातेधारकाच्या खात्यातून 25 रुपये कापले जाणार आहेत.

Updated: Dec 10, 2021, 04:10 PM IST
तुमच्या खात्यात कॅश डिपॉजिट केल्यावरही कापले जाणार पैसे, पण का? जाणून घ्या कारण title=

मुंबई : तुमचे देशातील सर्वात मोठी बँक SBI मध्ये खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. वास्तविक, एसबीआयचा असा नियम आहे, ज्यानुसार तुमच्या बँक खात्यात जर कोणी पैसे जमा केले तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. कॅश डिपॉझिट मशीन म्हणजेच सीडीएममधून पैसे जमा करणाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे. CDM द्वारे तुमच्या बँक खात्यात कोणी पैसे जमा केले असतील, तर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील. एकदा पैसे जमा केल्यानंतर खातेधारकाच्या खात्यातून 25 रुपये कापले जाणार आहेत. त्यात जीएसटीचाही समावेश आहे.

कसं आहे हे मशीन?

SBI च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हे एटीएमसारखे मशीन आहे. हे तुम्हाला एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरून थेट तुमच्या खात्यात रोख जमा करण्यास अनुमती देते. तुम्ही शाखेत न जाता तुमच्या खात्यात झटपट जमा करण्यासाठी हे मशीन वापरू शकता. तसेच तुम्हाला लगेच व्यवहाराची पावतीही उपलब्ध होते, ज्यामुळे तुम्हाला व्यवहाराची खात्री देखील होते.

तसेच या मशीनमुळे ग्राहकांचा वेळ वाचतो आणि कोणत्याही वेळी ग्राहकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणे शक्य होते. या मशीनमुळे प्रोसेस खुप फास्ट होते. परंतु आता तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.

याचे फायदे:

- तुमच्या खात्यात पैसे त्वरित जमा होतात.
- पेपरलेस व्यवहार
-प्रति व्यवहार मर्यादा 49,900 रुपये आहे आणि डेबिट कार्डद्वारे 2.00 लाख रुपये आहे (खात्यात पॅन क्रमांक प्रविष्ट केला असेल).
-तुम्ही तुमच्या PPF, RD आणि कर्ज खात्यांमध्ये रोख रक्कम देखील जमा करू शकता.
-एका वेळेच्या व्यवहारात 200 पर्यंतच्या नोटा जमा करता येतात.
-CDM फक्त रु.100/-, रु.500/- आणि रु.2000/- च्या नोटा स्वीकारते.
-तुमच्या खात्यातील शेवटच्या 10 व्यवहारांची माहिती तुम्हाला मिळते.