मोदींना मोठा धक्का; योगगुरु रामदेव बाबांनी केले 'हे' वक्तव्य

गेल्या निवडणुकीत रामदेव बाबांनी मोदींची बरीच स्तुती केली होती.

Updated: Sep 17, 2018, 03:53 PM IST
मोदींना मोठा धक्का; योगगुरु रामदेव बाबांनी केले 'हे' वक्तव्य title=

नवी दिल्ली: सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकर कमी केल्या नाहीत तर आगामी निवडणुकीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला साथ देणार नाही, असे वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर लवकरच नियंत्रणात आले नाहीत तर आगामी निवडणूक सरकारसाठी अवघड ठरेल. इंधनाचे दर कमी न झाल्यास मीदेखील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचा प्रचार करणार नाही. मी आता सर्वच राजकीय पक्षाच्या बाजूने आहे. रामदेव बाबांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींना समर्थन दिले होते. त्यावेळी रामदेब बाबांनी मोदींची बरीच स्तुतीही केली होती. मोदींसमोर युवराज राहुल गांधी म्हणजे अजाण बालक आहेत, असेही रामदेव बाबांनी म्हटले होते. 

मात्र, २०१८ पासून पंतप्रधान मोदींबद्दल रामदेव बाबांचे मत बदलायला सुरुवात झाली. मी अजूनही मोदी सरकारच्या धोरणांचा समर्थक आहे. मात्र, यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. 2019 आधी इंधनाचे दर कमी करा असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे. रामदेव पुढे म्हणाले की, जर सरकारने मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी दिली आणि करामध्ये थोडीफार सवलत दिली तर मी संपूर्ण देशात 35 ते 40 रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो. सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावे, असा पर्याय रामदेव बाबांनी सुचवला.