विमान प्रवासात बाळाचा जन्म झाला तर बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार

तुमच्या बाळाचा जन्म विमान प्रवासात झाला आहे का, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...

Updated: Oct 7, 2021, 01:56 PM IST
विमान प्रवासात बाळाचा जन्म झाला तर बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार title=

मुंबई : लंडनहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मंगळवारी एका मुलाचा जन्म झाला. त्यामुळे आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की मुलाला नक्की कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळेलं. महत्त्वाचं 7 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलेला भारतात विमान प्रवास करण्याची परवानगी नाही, परंतु काही विशेष प्रकरणांमध्ये याला परवानगी आहे. . अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेने भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विमानात मुलाला जन्म दिला तर जन्माचे ठिकाण काय असेल आणि मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात बाळाचे नागरिकत्व काय असेल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

अशा  परिस्थितीत विमान केणत्या देशाच्या सिमेवरून उड्डण भरत आहे महत्त्वाचं आहे. विमानातून उतरल्यानंतर, बाळाच्या जन्म प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रे संबंधित देशाच्या विमानतळ प्राधिकरणाकडून मिळू शकतात. एवढंच नाही तर बाळाला त्याच्या पालकांचे राष्ट्रीयत्व मिळवण्याचा अधिकार आहे. पण विमानात जन्मलेल्या मुलांच्या नागरिकत्वाबाबत प्रत्येक देशात वेगवेगळे नियम आहेत.

उदाहरणार्थ, जर पाकिस्तानमधून अमेरिकेत जाणारे विमान भारतीय सीमेवरून जात असेल आणि जर विमानात मुलाचा जन्म झाला. तर त्या मुलाचे जन्मस्थान भारत मानले जाईल आणि त्या मुलाला भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. त्याचप्रमाणे बाळाला त्याच्या पालकांचे राष्ट्रीयत्व मिळवण्याचा अधिकार आहे. मात्र, भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही.