बिना बँड, हुंडा, मिरवणूक, जेवणाशिवाय होणार उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं आदर्श लग्न

बिहारमध्ये सध्या विनाहुंड्याच्या लग्नांना प्रोत्साहन दिलं जात आहे. यातच आता बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 3, 2017, 02:08 PM IST
बिना बँड, हुंडा, मिरवणूक, जेवणाशिवाय होणार उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं आदर्श लग्न title=

नवी दिल्ली : बिहारमध्ये सध्या विनाहुंड्याच्या लग्नांना प्रोत्साहन दिलं जात आहे. यातच आता बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे.

उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा मुलगा उत्कर्ष मोदीच्या लग्नला अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती हजेरी लावणार आहेत यासाठी पटनामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

कोलकात्याचे नवल वर्मा यांची मुलगी यामिनी सोबत उत्कर्ष मोदीचा विवाह होणार आहे. रविवारी हा विवाह कोणत्याही बँड बाजा, नाच गाणं, हुंडा याच्याशिवाय होणार आहे. वेटनरी कॉलेजच्या मैदानावर अत्यंत साध्या पद्धतीने विवाह होणार आहे. लग्नात जेवण देखीस नसल्याचं बोललं जातंय.

अनेक राज्यांचे राज्यपाल, बिहारसह इतर राज्यातील मंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, विधानपरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यातील मंत्री हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

लग्न समारंभात केंद्रीय मंत्री अरुण जेटली, ग्राहक आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक, बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी, गोव्याच्या मृदुला सिन्हा आणि मेघालयचे गंगा प्रसाद, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, कृषिमंत्री राधा मोहन सिंग, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, रसायनमंत्री अनंत कुमार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, अर्थराज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग, अन्न व प्रक्रिया मंत्री साध्वी निरंजन ज्योती, मानव संसाधन विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, ग्रामीण विकास मंत्री राम कपाल यादव हे देखील उपस्थित असणार आहेत.

मुख्यमंत्र्यांमध्ये बिहारचे नितीश कुमार, झारखंडचे रघुवर दास, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे रमण सिंग, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंग रावत आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य देखील लग्न समारंभात उपस्थित असतील.

सुशील कुमार मोदी यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देखील नाही छापली गेली आहे. आमंत्रण ई-कार्ड्सने पाठविले गेले आहे. हुंडा मुक्त विवाह आहे. अतिथींनी कोणत्याही प्रकारची भेट आणण्यास मनाई केली गेली आहे. विवाहात अवयव दानसाठी स्टॉल लावण्यात येणार आहे. बाल विवाह निषेध आणि हुंडामुक्त विवाहासाठी संकल्प पत्र भरले जाणार आहेत. पाहुण्यांना ४ लाडू देण्यात येणार आहे. सोबतच एक पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. शिवाय चहाशी व्यवस्था असणार आहे.