मुंबई : ICICI Bank credit card Services: आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर तुम्हाला बँकिंग सेवांवर अतिरिक्त शुल्क लागू शकते. बँकेने क्रेडिट संबधित विविध सेवांवरील शुल्कांमध्ये वाढ केली आहे. 10 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेने अनेक सेवांचे शुल्क वाढवले आहेत. यामध्ये लेट पेमेंट शुल्काचा सामावेश आहे. 10 फेब्रुवारी पासून या अतिरिक्त शुल्काची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याशिवाय तुमचा चेक परत गेला तर बँक संपूर्ण Due Amount वर 2 टक्के दराने शुल्क वसूल करणार आहे. यासाठी बँक कमीत कमी 500 रुपये वसूल करणार आहे. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्या खिशाला चटका बसणार आहे.