Chandrayaan-3: यशस्वी लँडिंगनंतर चांद्रयान-3 ने पाठवला पहिला मेसेज; 'मी चंद्रावर पोहोचलोय आणि तुम्हीसुद्धा...'

Chandrayaan 3 Landed on Moon: इंडिया, मी चंद्रावर पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा, असा संदेश चांद्रयान-3 कडून पाठवण्यात आला आहे. इस्त्रोने (ISRO) ट्विट करत याची माहिती दिली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 23, 2023, 07:29 PM IST
Chandrayaan-3: यशस्वी लँडिंगनंतर चांद्रयान-3 ने पाठवला पहिला मेसेज; 'मी चंद्रावर पोहोचलोय आणि तुम्हीसुद्धा...' title=
Chandrayaan-3 send first massage

Chandrayaan-3 Send first massage : चांद्रयान-३ (Chandrayaan-3) च्या यशस्वी लँडिंगकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं. अशातच आता चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan-3 soft-landed) केली आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरला आहे.  तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. अशातच आता चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचल्यानंतर चांद्रयान-3 ने पहिला मॅसेज (handrayaan-3 send first massage) पाठवला आहे.

इंडिया, मी चंद्रावर पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा, असा संदेश चांद्रयान-3 कडून पाठवण्यात आला आहे. इस्त्रोने ट्विट करत याची माहिती दिली आहे. चांद्रयान-3 ने यशस्वी लँडिंग केली आहे, अशी माहिती देखील इस्त्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर वैज्ञानिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली.

पाहा ट्विट 

रशियाची चंद्र मोहीम लुना-25 अपयशी ठरल्यानंतर आता संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे लागल्या होत्या. अशातच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी नासाला जे जमलं नाही ते करून दाखवलं आहे. त्यामुळे आता जगभरात भारतीय वैज्ञानिकांचं कौतूक होताना दिसत आहे.

चांद्रयानाच्या यशावर मोदी काय म्हणाले?

जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होतात. हे क्षण फार अविस्मरणीय, अभुतपूर्व विकसित भारताच्या शंखनादाचे आहेत. अडचणींचा महासागर आपण पार केले आहेत. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा, 140 कोटींच्या ह्रदयाच्या सामर्थ्याचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.