भारतीय न्यायव्यवस्थेने अनेकदा माणूसकी दाखवत, मोठ-मोठ्या गुन्हेगारांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. गुरूवारीही असेच काहीसे झाले. एका दहशतवाद्याला त्याच्या आजारी आईशी संवाद साधायची परवानगी, दिल्ली हायकोर्टाने दिली आहे. कैदी कस्टडी पेरोलची मागणी करत होता. या प्रक्रियेत कैद्याला काही काळाची सवलत दिली जाते. तुरुंगातून बाहेर पडून तो त्याच्या नातेवाईकांना भेटू शकतो आणि मग त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाते. मात्र कैद्याच्या गुन्ह्याची तीव्रता बघता, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
यासीन भटकल
या दहशतवाद्याचे नाव यासीन भटकल आहे. तो इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा सह-संस्थापक आहे. भारत सरकारने जुन 2010 ला या संघटनेला एक आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले. या संघटनेतील लोकांचा संबंध, इतर आतंकवादी संघटनांशीसूद्धा होता. या संघटनेची स्थापना यासीन भटकल आणि अमिर रेझा खान या दोघांनी मिळून केली होती. 2003 साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
पटियाला हाऊस कोर्टाचे मुद्दे
न्यायाधीश डॉ. हरदीप कौर यांच्या नेतृत्त्वाखाली हा खटला चालला होता. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हे सत्र घेण्यात आले होते. न्यायाधीशांनी कस्टडी पेरोलची मागणी नाकारल्यावर यासीनने गयावया केली. म्हणून मग शेवटी कोर्टाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आईशी संवाद साधायची परवानगी दिली. हा संवाद फक्त हिंदी भाषेतच झाला पाहिजे, असा आदेश न्यायाधीशांनी दिला.
पोलिसांचा विरोध
न्यायाधीशांनी गरजेनुसार संवाद रेकॉर्ड करायची अनुमती दिली. याच महिन्यात भटकलच्या आईच्या ह्रदयाची सर्जरी झाली होती. सध्या तिची तब्बेत फारच खालावली आहे. गेल्या तेरा वर्षांपासून यासीन तुरुंगात आहे. या आधी त्याला कुटुंबातील कोणालाही भेटायची अनुमती मिळाली नव्हती.
दहशतवाद्याच्या मागणीला पोलिसांनी विरोध केला होता. मात्र न्यायालयाने अनुमती दिली.
यासीनवरील आरोप
2012 साली भारतात आसंतोष पसरवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, यासीन भटकल ला ताब्यात घेतले होते. 2008 साली दिल्लीत झाललेल्या बॉम्ब हल्लात 26 जणांचा मृत्यू झाला असून, 135 जण गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला घडवून आणण्यात यासीनची मोठी भुमिका होती.
कोण आहे हा यासीन?
यासीन भटकल मुळचा उत्तर कर्नाटकातील भटकल गावंचा आहे. 2013 साली यासीनला भारत-नेपाळच्या सीमेवरुन पकडले होते. हैद्राबाद मध्ये 2013च्या फेब्रुवारीत, एकाच वेळी दोन विस्फोट करण्यात आले होते. या हल्ल्यातदेखील यासीनचा हात होता. त्याला फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे.अशा आतंकवाद्यांच्या मागण्यापूर्ण करणे योग्य की अयोग्य यावरुन आता चर्चा सुरू आहेत.