पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पाटीदारच नाही तर जाट आणि मराठा आरक्षणाचंही मी समर्थन करतो, असं वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्याचं मी आधीपासूनच समर्थन केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर माझा दृष्टीकोन स्पष्ट आहे. मराठा आणि जाट आरक्षणाला मी पाठिंबा देतो. तसंच समाजाला आरक्षण का मागायला लागतंय याचाही विचार करायला हवा, असं नितीश कुमार म्हणालेत.
गुजरातच्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होईल. गुजरातमध्ये भाजपला कोणताही धोका नाही, असा दावाही नितीश कुमार यांनी केला आहे. ज्या राज्याचे पंतप्रधान आहेत ते राज्य पंतप्रधानांचा पक्ष सोडून दुसऱ्या पश्राला का निवडून देईल, असा सवाल नितीश कुमार यांनी उपस्थित केला.