हैदराबाद : एका धारदार कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आलायं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमऱ्यात कैद झालायं. ही घटना घडत असताना तिथे पोलिसांची गाडी देखील होती हे पण त्यामध्ये दिसतयं. पिवळ्या रंगाचं शर्ट घातलेला एक इसम भर रस्त्यात पीडित युवकावर धारदार कुऱ्हाडीचे घाव घालतोय. अतिशय निर्दयतेने एकामागोमाग एक घाव तो घालत चाललाय.
सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोयं. ही घटना घडत असताना शेजारी खूप सारेजण गोळा झालेले दिसताहेत. त्यातले काहीजण पीडित इसमाला वाचवायचा प्रयत्नही करताना दिसतात. पण हल्ला करणारा इसम या सर्वांना ढकलून देत घाव घालण सुरूचं ठेवतो.
Man hacked to death in broad daylight in busy #Hyderabad junction. The shocking video begins with victims lying on the ground on Attapur road near Pillar 143 of the PV Narasimha Rao expressway, being assaulted with an axe 13 times in 21 seconds even as vehicles pass by. pic.twitter.com/uCBMzbPaIV
— Rahul Singh (@rahulreports) September 26, 2018
थोड्या वेळाने त्या इसमाने कुऱ्हाड फेकून दिली आणि तिथून काढता पाय घेतला. निळे कपडे घातलेला दूसरा इसम कुऱ्हाड घेऊन निघून जातो. हा निळ्या शर्टवाला हल्लेखोराचा मित्र असल्याचे सांगण्यात येतंय. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हल्लेखोर आणि त्याच्या मित्राला अटक केल्याचे सांगण्यात येतंय. कोणत्यातरी गोष्टीचा राग काढण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तिवरही हत्येचे प्रकरण सुरू असल्याचेही ते म्हणाले.