तीन मुलांची आई पाचव्या प्रियकरासोबत गेली पळून, हतबल नवऱ्याचे प्रयत्न पाहून डोळ्यात पाणी येईल

Husband And Wife News: पाचव्या प्रियकरासोबत पत्नी पळून जाताच हतबल झालेल्या पतीने केलं असं काही की डोळ्यात पाणी येईल. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 3, 2023, 01:31 PM IST
तीन मुलांची आई पाचव्या प्रियकरासोबत गेली पळून, हतबल नवऱ्याचे प्रयत्न पाहून डोळ्यात पाणी येईल title=
husband wife news in marathi Mother of three children eloped with her fifth lover

Husband And Wife News: पती-पत्नीच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. जर विश्वासच नसेल तर या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. पती किंवा पतीचे अनैतिक सबंध आणि त्यातून घडणारे गुन्हे याचे प्रमाण वाढत चालले आही. अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथील तीन मुलांची आई असलेली महिला तिच्या पाचव्या प्रियकरासोबत फरार झाली. त्यानंतर पतीने केलं असं काही की सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. 

रिना असं या महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनिल राजभर असं आहे. दोघांचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना तीन मुलं देखील आहेत. रिना घरातून पळून गेल्यानंतर पीडित पती आणि तीन मुलांनी हातात पत्नीचे पोस्टर घेऊन गावोगावी तिला शोधत फिरत आहेत. मात्र, अद्याप तिचा काहीच पत्ता लागला नाहीये. त्याने पोलिस ठाण्यातही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. 

पीडीत पती अनिल राजभर याने पोलिसांना सांगितले की, कामाच्या संदर्भात तो चंदीगढ येथे गेला होता. त्यावेळी त्याची ओळख रिना नावाच्या मुलीसोबत झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी मंदिरात लग्न केले. लग्नानंतर दोघे अनिलच्या गावी आले आणि तिथेच राहू लागले. त्यांना एक मुलगी व दोन जुळी मुलंदेखील झाली. लग्नाच्या 9 वर्षांनंतरही रिना नेहमी तिच्या मित्रांबद्दल बोलत असायची, मात्र मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले, असं अनिल यांनी म्हटलं आहे. 

मी कानानिमित्त सतत बाहेरगावी असायचो तेव्हा पत्नी सतत कोणाशीतरी बोलत असायची. एकदा त्याने पत्नीला ती कोणाशी बोलतेय याबाबत जाब विचारला तेव्हा ती बावरली व उत्तर देण्याची टाळले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता तिला एकाचा फोन आला आणि तो शौचालयाला जाण्याचा बहाणा बनवून घरातून पळून गेली, असही अनिल यांनी म्हटलं आहे. 

अनिल यांच्या म्हणण्यानुसार, ते जेव्हा कामावरुन परतले तेव्हा ती घरात नव्हती. तेव्हा त्यांनी मुलांकडे चौकशी केली. तेव्हा या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. पत्नी घरातून पळून गेल्याचे लक्षात येताच अनिलने तिची सगळीकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. या घटनेचा एक महिना झाला तरी तिचा काहीच पत्ता लागला नाहीये. 

अनिलने आरोप केला आहे की, त्याची पत्नी रिनाने अनेक लग्न करुन लोकांना फसवले आहे. ती जास्त दिवस कुठेच राहत नाही. मात्र, आमच्या लग्नाला नऊ वर्षे झाले होते. आम्हाला तीन मुलंदेखील होती. त्यामुळं मला वाटलं की ती प्रमाणिकपणे माझ्यासोबत राहते आहे.