Human Hygiene: कोरोना काळ पाहिल्यानंतर आपण स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊ लागलो आहोत. खोकताना रुमाल वापरणे, सतत हात धुणे या क्रिया आपल्या सवयीचा भाग झाल्या आहेत. एकंदरीत काय तर आजकाल बरेच लोक स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागले आहेत. असे असतानाही भारतात अजूनही स्वच्छतेशी संबंधित समस्या दिसून येत आहेत. खाण्यापिण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत बहुतेक लोक स्वच्छतेची काळजी घेत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अंडरवेअरच्या स्वच्छतेबद्दल फारस बोललं जात नाही. पण सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्वच्छतेविषयी तुम्ही किती जागरुक असायला हवं, हे यातून तुम्हाला कळणार आहे.
भारतात स्वच्छता ही मोठी समस्या आहे. कारण दुकानदारापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकजण आपल्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. यामध्ये विशेषत: कपडे आणि अंतर्वस्त्रांचा विचार केला तरी स्थिती खूपच भयानक आहे. अनेक लोक कपडे आणि अंतर्वस्त्रांबाबत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आलंय. दर 5 पैकी 1 जण असा आहे जो अंडरवेअर दोनदा घातल्यानंतरच धुतो. कारण एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. आपण आपल्या स्वच्छतेबाबत किती जागृक आहोत? हे यातून दिसते. त्यामुळे हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे.
ऑनलाइन कपड्यांच्या किरकोळ विक्रेत्याने यासंदर्भात संशोधन केलंय, लोक त्यांचे इनरवेअर किती वेळा धुतात? हा त्याच्या संशोधनाचा विषय होता. एक अंडरवेअर किती दिवस वापरली जाते? याबद्दल त्याने आपल्या संशोधनातून प्रश्न विचारले. यातून आलेला निकाल खूपच धक्कादायक होता. अनेक लोकांना अंडरवेअर धुण्यापूर्वी किमान दोनदा घालणे आवडते, असे संशोधनात दिसून आले. सतत गलिच्छ अंडरवेअर घालण्याच्या बाबतीत पुरुष हे महिलांपेक्षा पुढे असल्याची माहिती समोर आली. अंडरवेअर धुण्यापूर्वी आपण दोनदा घालतो असे किमान 31% लोकांनी कबूल केले.
इनरवेअरच्या बाबतीत स्त्रियांनाही प्रश्न विचारण्यात आला. एक इनरवेअर दोनदा परिधान करत असल्याचे 10 टक्के स्त्रियांनी कबुल केले. तसेच काहीवेळा अंडरवियरचा अधिक वापर करण्यासाठी अंडरवियरची आतली बाजू बाहेर करुन पुन्हा परिधान करत असल्याचे काही पुरुषांनी कबूल केले.
तथापि, अंडरवेअरपेक्षा ब्रा न धुता परिधान करत असल्याचे महिलांनी मान्य केले. ब्रा न धुता 5 दिवसांपेक्षा जास्त काळ घालू शकतो असेही काही महिलांनी मान्य केल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालंय.