Income Tax Saving Idea: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी वर्षे 2024-25 चा अर्थसंकल्प जाहीर केलाय. या अर्थसंकल्पात सर्वात मोठा फटका मध्यमवर्गीयांना बसला. नोकरदार वर्गासाठी न्यू टॅक्स रिजीम ही फार चिंतादायक आहे. देशातला नोकरदार वर्ग आता आयटीआर फाईल करायला लागला आहे. 31 जुलै ही आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख आहे.यानंतर आयटीआर भरणाऱ्यांना जास्त पैसे मोजून आयटीआर भरावा लागेल. त्यामुळे आयटीआर भरणाऱ्यांकडे नोकरदार वर्गाची रांग लागली आहे. दरम्यान सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये 100 टक्के टॅक्स वाचवण्याची आयडिया एक तरुण शेअर करतोय. त्याचा हा व्हिडीओ लोकांना फार आवडतोय. त्यामुळे अल्पावधितच हा तरुण लोकप्रिय झालाय. त्याचा व्हिडीओ चर्चेत आलाय. त्यावर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडतोय. असं काय आहे या व्हिडीओत जाणून घेऊया.
व्हिडीओ दिसणारा हा व्यक्ती कर्नाटकचा असल्याचे म्हटले जात आहे. त्याने सोशल मीडियावर एक मजेशिर आयडीया शेअर केली आहे. '100 टक्के टॅक्स वाचवण्यावर आर्थिक सल्ला' त्याने व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे. श्रीनिधी हांडे असं या तरुणाचे नाव असून त्याने केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर झाल्यानंतर इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. नोकरदार वर्ग आपला शंभर टक्के टॅक्स कसा वाचवू शकतो? असे या व्हिडीओत सांगताना दिसतोय. त्याच्या म्हणण्यानुसार नोकरदार व्यक्ती आपल्या घरी गवत उगवून आणि ते विकून 100 टक्के टॅक्स वाचवू शकतो.
हांडे चा व्हिडीओ सोशल मीडियात खूप चर्चेत आहेत. इंस्टाग्रामवर त्याच्या व्हिडीओला 2 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय. हा व्हिडीओ चार्टड अकाऊंटंट अखिल पचोरीने आपल्या एक्स हॅंडलवर शेअर केलाय. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आपले हसू रोखू शकत नाहीत. इनकम टॅक्सवर शंभर टक्के कसे वाचवायचे हे हांडेने सांगितले आहे. खूप सोपी, कायदेशीर आणि सरळ प्रक्रिया आहे, असे हांडे सुरुवातीला आपल्या व्हिडीओमध्ये सांगतो.
सर्वात पहिलं पाऊल म्हणजे तुमचं घर किंवा बाल्कनीत किंवा छतावर कसंल तरी गवत उगवायला हवे. गवत उगवल्यानंतर तुम्ही एचआरकडे जा आणि बोला की मला पगार नकोय. असे बोलल्यावर एचआर आनंदून जाईल. यानंतर तिसरं पाऊल तुम्हाला उचलायचंय ते म्हणजे,एच आरला सांगायचं की माझ्या पगाराच्या किंमती इतकं गवत तुम्हाला खरेदी करावं लागेल. म्हणजेच समजा तुमचा पगार 50 हजार रुपये असेल तर तुम्ही त्या किंमतीचे गवत त्यांना विका. ही सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे. यानंतर हांडे यांनी आपल्या सल्ल्यामागचा तर्क सांगितला आहे.
Salaried Class, this video is for you...
How to save 100% income tax इ#Budget #Satire pic.twitter.com/UZBzuPNklV
— CA Akhil Pachori (@akhilpachori) July 25, 2024
आता होतं काय की पगारातून तुमची मिळकत किती? तर शून्य रुपये.कारण तुम्ही कोणता पगारच स्वीकारला नाही. आत तुमच्याकडे जी काही कमाई असेल ती शेतीतून झालेली असेल. हे असं इनकम आहे, ज्यावर भारत सरकार तुमच्याकडून कोणताही टॅक्स घेणार नाही. अशाप्रकारे तुम्ही तुमचा शंभर टक्के टॅक्स वाचवू शकता. बऱ्याचदा टॅक्स कापला जाणाऱ्यांना टीडीएस किंवा गुंतवणूक कुठे दाखवायची? असा प्रश्न पडतो. यासाठी ते सीएची मदत घेतात. पण ही आयडीया वापरल्यावर तुम्हाला असं काही करावं लागणार नाही, असे हांडे आपल्या व्हिडीओतून सांगतोय.