Aadhar-Pan Linking Last Date : इन्कम टॅक्सकडून एक महत्वाची आणि मोठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे . शनिवारी ही अधिसूचना जारी करण्यात आलीये. यानुसार, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पण कार्ड आधार कार्डला लिंक करावं लागणार आहे कारण ३१ मार्चपर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाहीत तर ते बिनकामाचे समजण्यात येईल.जर तुम्हीसुद्धा अद्याप तुमचं पॅन आधारशी लिंक केल नसेल तर घाई करा ताबडतोब हे काम उरकून घ्या. (how to link pan card with aadhar card online news in marathi)
असं न केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आयटी रिटर्न तुम्ही फाईल करू शकणार नाहीत, इतकंच काय तर, आवश्यक अश्या सुविधांचा लाभसुद्धा घेऊ शकणार नाहीत. तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आधारसोबत लिंक करू शकतात, पॅन ते करण्यासाठी काही गाईडलाईन्स पाळाव्या लागतील , काय आहेत त्या गाईडलाईन्स चला जाणून घेऊया.