तुम्ही भेसळयुक्त तूर डाळ तर खात नाही ना? अशी ओळखा खरी डाळ

त्यामुळे आपण बारकाईने जरी डाळ पाहिली तरी आपल्याला त्यातील फरक समजणार नाही.

Updated: Sep 14, 2021, 05:23 PM IST
तुम्ही भेसळयुक्त तूर डाळ तर खात नाही ना? अशी ओळखा खरी डाळ title=

मुंबई : बहुतेक लोकांना तूरीची डाळ खायला आवडे, ज्यामुळे त्यांच्या जेवणात या डाळीचा समावेश असतो, याला पिवळी डाळ किंवा अरहर डाळ असेही म्हणतात. तूर डाळीचे अनेक प्रकार तुम्हाला बाजारात मिळतील. वेगवगळ्या प्रकारच्या डाळीमुळे त्याची चव देखील सहाजिकच वेगळी असते. ही डाळ आपल्याला काही भागात पॅक केलेली म्हणजे पॅकेटवाली मिळते, तसेच तुम्हा बाजारातून सुटी किंवा सैल डाळ देखील विकत घेऊ शकता.परंतु ही डाळ खरेदी करम्यापूर्वी त्यात भेसळ झाली नाही याची खात्री करा. कारण सध्या बाजारात भेसळ युक्त डाळीचं प्रमाण वाढलं आहे.

त्यामुळे आपण बारकाईने जरी डाळ पाहिली तरी आपल्याला त्यातील फरक समजणार नाही.

पॉलिश आणि अनपॉलिश डाळ

वेगवेगळ्या जातींची तूर डाळ दिसायला सुद्धा वेगळी दिसते. यापैकी तूर डाळींच्या काही जाती लवकर शिजतात, तर काही शिजण्यास वेळ लागतो.

तुम्हाला बाजारात पॉलिश आणि अनपॉलिश अशा दोन्ही तूर डाळ मिळतील. अनपॉलिश असलेले डाळ ही त्याच्या पूर्ण दाण्यापासून वेगळी केलेली असती, ज्यामुळे त्यांपैकी काही डाळींवर आपल्याला त्याची साल देखील राहिलेली दिसते. ही डाळ शिजवल्यानंतर त्याची चव आपल्याला इतर डाळींपेक्षा वेगळे लागते मात्र, ते खाल्याने आपले काहीच नुकसान होणार नाही.

तर पॉलिश केलेल्या डाळीच्या साली काढून टाकल्या जातात आणि ही डाळ दिसायला चमकदार दिसते. बहुतेकदा बाजारात पॅकेटमध्ये आपल्याला पॉलिश डाळ पाहायला मिळते. तसेच पॉलिश डाळ आपण बराच काळ साठवून देखील ठेवू शकतो, ती प्रक्रिया केली असल्याने लवकर खराब होत नाही किंवा तिला टोके लागत नाही.

डाळीत भेसळ

कधीकधी डाळीत रसायने घालून तिला पॉलिश केले जाते आणि त्याला छान गडद पिवळा रंग मारला जातो. परंतु हा रंग दिसायला जरी चांगला दिसत असला तरी तो आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतो.

या व्यतिरिक्त या डाळीशी मिळते जुळते बियाणे किंवा पदार्थ जे स्वस्त्यात उपलब्ध असताता त्यांना या तूरीच्या डाळींमध्ये मिसळले जातात. ज्याचे शास्त्रीय नाव लॅथीरस सेटाइबसआहे.

आकार पहा

कधी कधी तूर डाळीत खेसारी डाळ मिसळली जाते. ही डाळ पिवळ्या रंगाची असते परंतु ती आकाराने किंचित चौकोनी असते. तुळ डाळापेक्षा ती अधिक सपाट किंवा चपटी असते. तूर आणि खेसारी डाळ यामध्ये डोळ्यांनी फरक करणे कठीण आहे, परंतु आपण आकाराकडे निट लक्ष दिले तर आपण ते ओळखू शकता. खेसारीडाळ तूर डाळीत मिसळल्याने ती डाळीची चव खराब खरते. तसेच या डाळीमुळे पोटात गॅस देखील निर्माण होतो.

सिंथेटिक अन्न रंग

कधीकधी Tetrazzini  नावाचा सिंथेटिक फूड कलर देखील तूर डाळीत टाकला जातो. यामुळे विविध एलर्जीक प्रतिक्रिया आणि ओठ, जीभ, घसा आणि मानेला सूज देखील येऊ शकते. भेसळयुक्त डाळी खाल्ल्याने दम्याची समस्या वाढू शकते आणि त्यामुळे रक्ताभिसरणातही समस्या निर्माण होते.

डाळ खरेदी करताना त्याच्या दिसण्यावर जाऊ नका

डाळ खरेदी करताना त्याच्या सुंदर दिसण्यावर किंवा रंगावर जाऊ नका, कारण ही डाळ भेसळयुक्त असू शकते. भेसळयूक्त डाळ ओळखण्यासाठी ती शिजवण्यापूर्वी काही काळ पाण्यात भिजवून ठेवा. जर त्यात रंग मिसळला गेला असेल तर तो डाळीपासून वेगळा होण्यास सुरू होतो, ज्यामुळे पाणी पिवळ्या रंगाचं होईल. याद्वारे आपण घरगुतीपद्धतीने डाळ भेसळयुक्त आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.