Kitchen Tips: घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवतील या 5 टिप्स

मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता

Updated: Dec 27, 2022, 03:50 PM IST
Kitchen Tips: घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवतील या 5 टिप्स title=

how to preserv spices in kitchen: स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ आहेत जे आपण व्यवस्थित ठेवले नाहीत तर ते लवकर खराब होऊन जाण्याची शक्यता असते.  हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेच्या आद्र्रतेमुळे काही मसाले लवकर खराब होऊ शकतात अशा वेळी काय करायचं त्यांना कसं व्यवस्थित ठेवायचं असा मोठा प्रश्न गृहिणींना नेहमी सतावतो आणि म्हणूनच आजच्या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत कश्या प्रकारे किचनमधील मसाले कसे साठवून ठेऊ शकता.    

मसाले किंवा मीठ साखर खराब होणं किंवा त्याला पाणी सुटण्याचं प्रमाण नेहमीच असतं, बऱ्याचदा साखर आणि मीठाला पाणी सुटल्याने ते खराब होतात. मसाल्यामध्ये छोटे किडे होतात किंवा त्यावर बुरशी लागते. अशा सगळ्या समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर तुम्ही या सोप्या टीप्स वापरा आणि मसाल्यांना सुरक्षित आणि जास्त काळासाठी चांगलं ठेवू शकता. (how to preserv spices in kitchen)

मीठ किंवा साखर आणि त्यासोबत मसालेही तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता. त्यामध्ये सुद्धा काचेचा डबा हा कायम एअर टाइट असणं गरजेचं आहे. प्लास्टिकमध्ये लवकर मीठाला पाणी सुटू शकतं त्यामुळे चीनी मातीचं भाडं किंवा काचेचं भांड वापरणं केव्हाही उत्तम पर्याय आहे. 

मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता. याचा दुसरा असा फायदा आहे की लवंग ठेवल्यानं साखरेला मुंग्या लागत नाहीत. तर मसाल्यांसाठी बिब्बा वापरू शकता. बुब्यामुळे मसाल्यामध्ये प्राणी होत नाहीत. किंवा बुरशी लागण्याचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक घरात मसाले असू द्या किंवा मीठ-साखर यांना कधीही ओले हात लावू नका. त्यामध्ये ओला चमचा वापरू नका. त्यासाठी वेगळा चमचा ठेवा. चमचा किंवा हात ओले असतील तर त्यामुळे देखील बुरशी पकडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शक्यतो ही काळजी घ्या. 

तांदळाचे दाणे हे मॉइश्चर शोषून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही जेव्हा डब्यात साखर किंवा मीठ भरत असाल तेव्हा तळाला आधी तांदुळाचं एक छोटं पुडकं बांधून डब्यात ठेवा. त्यामुळे दमटपणा नाहीसा होईल आणि पाणी सुटणार नाही. याशिवाय तुम्ही एअऱटाइट कंटेनर किंवा डब्यांचा वापर केलात तरीही उत्तम पर्याय आहे. (how to preserv spices in kitchen)