तुम्ही कोणाशी फोनवर बोलत होतात? हे कोणालाच कळणार नाही....अशी लपवा Call History

कोणाचा तरी अवेळी येणारा फोन किंवा मॅसेज लपवायचा असेल, तर काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही हे करु शकता.

Updated: Jul 8, 2021, 08:57 PM IST
तुम्ही कोणाशी फोनवर बोलत होतात? हे कोणालाच कळणार नाही....अशी लपवा Call History title=

मुंबई : स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण उठता बसता. सर्वत्र फोनचा वापर करतो. आपल्या फोनपेक्षा लांब आपण 5 मिनिटं देखील राहू शकत नाही. कारण त्यामध्ये आपल्या काही प्रायवेट गोष्टी असतात. त्यामुळे जर तुम्ही फओन तुमच्यापासून लांब ठेवलात तर तुम्हाला कोणी फोन करतोय का? कोणी मॅसेज करतोय का? याकडेच लक्ष असतं.

हे कॉल मॅसेज कोणीही पाहू नये असे आपल्याला वाटत असते. परंतु बऱ्याचदा असे घडते की, आपल्या घरचे काही लोकं आपला मोबाईल वापरत असतात त्यामुळे तुम्ही काय करताय? तुम्हाला कोणचा आणि कधी कॉल आला हे तुमच्या कॉल हिस्ट्रीवरुन त्यांना समजु शकते.

अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या फोनवरून कॉल हिस्ट्री हटवू इच्छित असाल किंवा एखाद्या विशिष्ट क्रमांकाच्या कॉलची हिस्ट्री तुम्हाला हटवायची असेल, किंवा कोणाचा तरी अवेळी येणारा फोन किंवा मॅसेज लपवायचा असेल, तर काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही हे करु शकता.

हिस्ट्रीमधू कॉल कसे काढावे?

- फोन अ‍ॅपलीकेशन उघडा.
-कोणताही नंबर किंवा संपर्क टाईप करा.
-कॉल तपशीलवर टॅप करा.
-त्यानंतर त्या कॉलला तातपूरते ब्लॉक करा
-ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेळेला कॉल किंवा मॅसेज येणार नाही
-त्याशिवाय ब्लॉक केल्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मॅसेज डायरेक्ट मॅसेजमध्ये न येता ते ब्लॉक फोल्डरमध्ये जातील
- हे ब्लॉक केले मॅसेज कोणालाही न समजता तुम्ही ब्लॉकमध्ये जाऊन पाहू शकता आणि तेथूनच रिप्लाय देऊ शकता.

दुसरा पर्याय असा की, तुम्ही कोणासोबतही कॉलवर बोलत असाल आणि तो असा कॉल आहे, जो तुम्हाला कोणापासून लपवायचा आहे. अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला कॉल लावा, त्यानंतर कॉल सुरु असताना मागे जा आणि त्या कॉल अॅपमध्ये त्या नंबर वर सिलेक्ट करा आणि त्यानंबर वर डिलीट हिस्ट्री करुन क्लिक करा.

असे केल्याने तुमचा कॉल तर सुरु राहिल, परंतु जर कोणी येऊन तुमच्या कॉल कट झाल्यावर त्याची हिस्ट्री पाहण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्याची हिस्ट्री मिळणारच नाही.

फॅक्टरी डेटा रीसेट

या व्यतिरिक्त, सिस्टममध्ये उपस्थित असलेल्या सर्व फायली आणि सेटिंग्ज फॅक्टरी डेटा रीसेटद्वारे काढल्या जाऊ शकतात.
तसेच, कॉल लॉग देखील हटविले जाऊ शकतात. ज्यात डायल केलेले कॉल, प्राप्त केलेले कॉल आणि मिस झालेले कॉल तुम्ही हटवू शकता.