काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack

Dark Patchy Neck Home Remedies: रणरणत्या उन्हामुळे चेहारा टॅन झाला आहे? चेहरा गोरापान पण मान, कोपरे किंवा ढोपर काळं पडलं आहे. आता काळजी नको घरच्या घरी तयार करा नैसर्गिक Beauty  Pack 

Updated: Jun 16, 2023, 11:41 AM IST
काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack  title=
how to get rid of black patchy Dark neck knee quickly at home remedies beauty tips Rice lentils coffee powder and turmeric De tan pack

Dark Patchy Neck Home Remedies in Marathi: उन्हाळा म्हटलं की रणरणत उन्ह...मग अशात घराबाहेर कामानिमित्त किंवा काही दिवसांसाठी फिरायला जायचं म्हटलं की पहिले चिंता वाटते ती आपली त्वचा टॅन होणार. बरोबर ना...आजकाल मार्केटमध्ये सुंदर दिसण्यासाठी, उन्हापासून त्वचेची रक्षका करण्यासाठी असंख्य प्रोडक्टर्स उपलब्ध आहेत. अनेक वेळा कितीही काळजी घेतली तरीही चेहरा सुंदर गोरापान दिसतो पण मान, कोपरे किंवा ढोपर काळी दिसतात. अशावेळी आपल्या सौंदर्याला लागलेला हा काळपटपणाचा डाग अनेकांना त्रासदायक वाटतो. त्यामुळे खास करुन महिला कोपरे किंवा ढोपर दिसू नयेत म्हणून पूर्ण झाकलेले कपडे घालतात.  (Beauty hacks)

पण आता काळजी करायची गरज नाही. घरच्या घरी मान, हाताचे कोपरे आणि ढोपरांचं काळेपणा नाहीसा करण्यासाठी आम्ही काही ट्रीक सांगणार आहोत. तुमच्या किचनमधील या गोष्टी तुमचं सौंदर्य वाढविण्यास मदत करणार आहेत.  (beauty tips)

 तांदळाची जादू! (beauty benefits of rice water in marathi)

सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) आपल्यासाठी किचनमधील काही साहित्यांपासून आपलं सौंदर्य कसं नैसर्गिकरित्या अजून सुंदर करता येईल याबद्दल सांगितलं आहे. तज्ज्ञांनानुसार तांदळाचा वापर आपण तेजस्वी त्वचा आणि गोरेपणासाठी करु शकतो. तांदळाचं पाणी आणि तांदळाची पेस्ट जेवढी केस निरोगी ठेवण्यासाठी मदतगार आहे. तेवढंच त्याचा उपयोग त्वचेवरील काळवंडलेपणा (Rice Flour For Skin) दूर करण्यासाठी सुद्धा आहे. (Skin Care)

तांदळाचा असा करा उपयोग (Home Remedies)

मान, कोपरे आणि ढोपरे गोरे  (how to clean Neck, knee) करण्यासाठी तांदळाचा वापर करा. झोपण्यापूर्वी अर्धा वाटी तांदूळ पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर या तांदुळाची पेस्ट करा. आता या पेस्टमध्ये 1 विटामिन-ई कॅप्सूल आणि 1 चमचा कॉफी  (coffee) मिक्स करा. आता हे मिश्रण मान, हाताचे कोपरे आणि ढोपरे या शिवाय चेहऱ्यालाही लावू शकता. 10 मिनिटं सुकेपर्यंत ठेवा. नंतर थंड पाण्याने ते धुवून घ्या. आता हलक्या हाताने moisturizer लावा. (how to get rid of black patchy Dark neck knee quickly at home remedies beauty tips Rice lentils coffee powder and turmeric De tan pack)

टॅन घालवण्यासाठी De tan pack 

एका वाटीत थोडे तांदूळ, लाल मसूरची डाळ घ्या आणि त्यात पाणी टाकून एक तास भिजायला ठेवा. आता तांदूळ आणि लाल मसूर डाळीची पेस्ट करा. त्यात थोडं दही आणि कॉफी पावडर मिक्स करा. ही पेस्ट शरीराला लावा. सुकेपर्यंत ठेवा त्यानंतर थंडा पाण्याने धुवून टाका. (Summer Special De tan Facemask)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गोरेपणा दिसण्यासाठी पॅक (Best Body Cleanser pack) 

घरच्या घरी गोरेपणा दिसण्यासाठी आता आम्ही अजून एक संपूर्ण शरीरासाठी एक पॅक सांगणार आहोत. एका वाटीत एक चमचा नारळाचं तेल घ्या, त्यात एक चमचा Flour, एक चमचा चण्याचं पीठ, एक चमचा कॉफी पावडर, अर्ध्या लिंबाच्या रस आणि दोन चमचे दही मिक्स करा. ही पेस्ट संपूर्ण शरीराला लावा. 15-20 मिनिटांनी धुवून टाका. (15-20 min application for best results only weekly)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

असा करा हळदीचा वापर सौंदर्यासाठी!

हे प्रत्येकाला माहिती आहे, हळद ही सौंदर्यासाठी खूप चांगली आहे. हळदीमुळे आपलं त्वचा तेजस्वी आणि गोरीपाण दिसते. आज आपण टॅन घालवण्यासाठी हदळीचा उपाय पाहणार आहोत. गॅसवर तवा ठेवा त्यावर एक चमचा हळद पूर्ण काळपट होईपर्यत भाजा. त्यानंतर भाजलेल्या हळदीत दूध आणि त्यात मध मिक्स करा. ही पेस्ट संपूर्ण शरीराला लावा. 15-20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका.  (Instagram video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे घरगुती आणि नैसर्गिक उपाय तुमच्या सौंदर्य खुलविण्यात नक्कीच मदत करतील. मार्केटमधील केमिकलयुक्त प्रोडेक्ट्स वापरण्यापेक्षा घरगुती आणि नॅचरल गोष्टीतून सौंदर्य चिरंतन राहिली.