ट्रेनमध्ये सीट मिळत नसेल तर हा सर्वात मोठा जुगाड, पण त्यानंतर रिस्कही तुमचीच, पाहा व्हिडीओ

यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही म्हणून भलताच जुगाड लावला.

Updated: Mar 11, 2022, 05:02 PM IST
ट्रेनमध्ये सीट मिळत नसेल तर हा सर्वात मोठा जुगाड, पण त्यानंतर रिस्कही तुमचीच, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आपल्याला जेव्हा लांबचा प्रवास करायचा असतो, तेव्हा आपण रेल्वेचा मार्ग अवलंबतो. कारण ट्रेनचा प्रवास हा सर्वात सोयीचा असतो. यासाठी लागणारं तिकीटाला देखील बऱ्यापैकी स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारं असतं. ट्रेनने आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर ट्रेन हा सर्वात चांगला आणि सोपा पर्याय आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांसोबत असं झालं असेल की, त्यांना रेल्वेमध्ये बसायला सीट मिळत नाही तेव्हा, त्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो किंवा मग टीसीसोबत बोलून जागा मिळवाली लागते.

यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही म्हणून भलताच जुगाड लावला, जो फसला देखील आणि या व्यक्तीचं हस्य झालं.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमध्ये सगळ्या सीट भरलेल्या आहेत. ज्यामुळे आपल्याला बसायला जागा नसल्यामुळे एका व्यक्तीने जुगाड लावला. त्याने वरच्या सीटला चादरीने बांधलं आणि त्याचा झोपाळा केल्या ज्यामध्ये तो झोपू शकतो.

यानंतर हा व्यक्ती त्या पाळण्यात झोपण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यामध्ये जातो सुद्धा परंतु तेवढ्यात पाळण्याच्या एका बाजूने दोरी सुटते आणि हा व्यक्ती जोरात खाली पडतो. नशीबाने या व्यक्तीला फारसं लागत नाही. त्या व्यक्तीच्या या अवस्थेवर तिथे बसलेले सर्व प्रवासी हसायला लागतात. आता हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल

हा व्हिडीओ बघायला इतका मजेशीर आहे की, बघताच क्षणी तुम्ही हसायला येईल. हा व्हिडीओ memes.bks नावाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'इतका जुगाड नाको रे भाऊ.' एका यूजरने कमेंट केली आहे की, रात्री झोपताना तुम्ही एखाद्यावर पडलात तर काय होईल. तेव्हा दुसऱ्या एका व्यक्ती लिहिले, 'भाईला जुगाड नेक्ट लेव्हलवर घेऊन जायचा होता.'