असा तपासा तुमचा PF बॅलेन्स

EPF पासबुक पाहण्यासाठी EPFOच्या वेबसाईटवर रजिस्टर करणं आवश्यक आहे. 

Updated: Jul 3, 2020, 03:50 PM IST
असा तपासा तुमचा PF बॅलेन्स title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : EPF पासबुकद्वारे किती बॅलेन्स आहे याची माहिती घेता येऊ शकते. EPF पासबुक पाहण्यासाठी EPFOच्या वेबसाईटवर रजिस्टर करणं आवश्यक आहे. जाणून घ्या यासाठी कसं कराल रजिस्टर-

- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करा.
- एक्टिवेट UAN (यूनिवर्सिल अकाऊंट नंबर) वर क्लिक करा.
- स्क्रिनवर नवं पेज ओपन होईल. यात यूएएन, आधार, पॅन आणि इतर बाबी भराव्या लागतील. 
- 'गेट ऑथरायजेशन पिन'वर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल. यात वरीलप्रमाणे भरलेली माहिती व्हेरिफाय करण्यासाठी विचारण्यात येईल. त्यानंतर मोबाईलवर एसएमएसद्वारे ओटीपी पाठवण्यात येईल.
- OTP टाकल्यानंतर 'वॅलिडेट OTP अँड एक्टिवेट UAN'वर क्लिक करा.  UAN एक्टिवेट झाल्यानंतर पासवर्डसह SMS येईल. अकाऊंटमध्ये लॉगइन करण्यासाठी पासवर्डचा वापर करा. लॉगइन केल्यानंतर पासवर्ड बदलताही येऊ शकतो.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर 6 तासांनंतरच EPF स्टेटमेंट, पासबुक पाहता येऊ शकतं.

EPF स्टेटमेंट डाऊनलोड करण्यााठी -

- https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login.jsp वेबसाईटवर क्लिक करा.
- यूएएन, पासवर्ड, कॅप्चा कोड भरुन लाॉगइनवर क्लिक करा
- लॉगइन केल्यानंतर पासबुक पाहण्यासाठी मेंबर आयडी निवडा

पासबुक PDF फॉर्मेटमध्ये असून डाऊनलोड करता येतं. मात्र Exempted PF Trustचं पासबुक पाहता येत नाही. अशा संस्था पीएफ ट्रस्टचे व्यवस्थापन स्वतः करतात.