मुंबई : तुमचं पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटचा दिवस आहे ३० सप्टेंबर... अर्थात आता आधार (AADHAAR) - पॅन (PAN) लिंक करण्यासाठी तुमच्याकडे केवळ काही दिवस उरलेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) कडून, आयकर रिटर्न (ITR) दाखल करणाऱ्यांचं पॅन कार्ड आधारशी लिंक असायला हवं असं सूचित केलं जातंय. पॅन आधारशी लिंक नसेल तर ते रद्दबादल ठरवण्यात येऊ शकतं. २०१७ मध्ये पहिल्यांदा हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा निश्चित तारखेपर्यंत पॅनला आधारशी लिंक केलं गेलं नाही तर ते अमान्य ठरेल, असंही म्हटलं गेलं होतं.
तेव्हापासून आत्तापर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्याची डेडलाईन सतत पुढे ढकलण्यात येत होती. शेवटी, ३१ मार्च २०१९ रोजी सीबीडीटीकडून यासाठी ३० सप्टेंबर ही अखेरची तारीख निश्चित करण्यात आली. तब्बल दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असल्यानं आत्तापर्यंत अनेक जण हेही विसरून गेलेत की त्यांनी नक्की आपलं पॅनकार्ड आधारला जोडलेलं आहे की नाही?
- आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा
- इथं डाव्या बाजुला Quick links च्या पर्यायात तुम्हाला Link Aadhaar ची लिंक मिळेल. यावर क्लिक करा.
- आता उघडलेल्या नव्या वेबपेजवर वरच्या बाजुला असलेल्या 'click here to view the status if you have already submitted Link Aadhaar request' वर क्लिक करा.
- आता उघडलेल्या नव्या वेबपेजवर तुम्हाला आधार आणि पॅनची माहिती विचारली जाईल.
- माहिती भरल्यानंतर 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा. इथे, तुमचं आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही हे तुम्हाला लगेच कळू शकेल.