कर्नाटक विधानसभा निवडणूक: सट्टाबाजारानेही दिले कमळ फुलण्याचे संकेत

कर्नाटकमध्ये यावेळी स्पष्ट बहूमताचे सरकार बणणे काहीसे कठीण असून, त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. अशी स्थिती निर्माण झाल्यास जेडीएस किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत.

Updated: May 14, 2018, 07:35 PM IST
कर्नाटक विधानसभा निवडणूक: सट्टाबाजारानेही दिले कमळ फुलण्याचे संकेत title=

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर प्रत्यक्ष मतमोजणी होऊन निकाल लागायला काही तसांचाच अवधी बाकी आहे. त्यामुळे निकालात जनतेचा कौल कुणाला मिळणार! याबाबत देशभरात प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, अनेक एक्झिट पोल्सनी आपापला अंदाज वर्तवला. पण, आता एक्झिट पोल्सपाठोपाठ सट्टाबाजारानेही आपले संकेत दिले आहेत. सट्टाबाजारात सुरू असलेल्या हालचालीनुसार कर्नाटकमध्ये कमळ फुलण्याची चिन्हे आहेत. सट्टाबाजारात भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार बोली लागली असल्याची सूत्रांची माहिती आहे. पण, सट्टाबाजारातून असेही संकेत मिळत आहेत की, कर्नाटकमध्ये यावेळी स्पष्ट बहूमताचे सरकार बणणे काहीसे कठीण असून, त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. अशी स्थिती निर्माण झाल्यास जेडीएस किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत.

कमळाला अच्छे दिन?

कर्नाटक विधानसभेसाठी २२२ जागांसाठी शनिवरी मतदान पार पडले. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्सच्या अंदाजात कर्नाटकात भाजपला अच्छे दिन दिसत असल्याचे भविष्य वर्तविण्यात आले आहे. तर, सट्टा बाजारातील बुकींच्या अंदाजानुसार भाजपला ९६ ते ९८ जागा मिळतील. तर, सत्ताधारी काँग्रेसला ८५ ते ८७ जागांवर समाधान मानावे लागेल असे दिसते. सट्टा बाजारातील भाषेनुसार मार्केटमध्ये बिड प्राईस ९६ ते ८५ आहे. म्हणजेच लावल्या जाणाऱ्या रकमेची किंमत ही ९८ ते ८७ आहे.

सट्टाबाजारात कसे लावले जातात पैसे?

एकावर एक या पद्धतीनुसार, जर तुम्ही भाजपवर १ लाख रूपये डावावर लावले आणि पक्ष जर ९८ किंवा त्याहून अधिक जागेवर जिंकून आला तर, आपल्याला एकच्या ठिकाणी २ लाख रूपये मिळणार. जर तुम्ही कर्नाटकमध्ये २२४ विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असलेल्या कर्नाटकमध्ये १२५ जागांवाल्या सेगमेंटवर डाव लावता आणि तुमचा अंदाज खरा ठरल्यास तुम्ही ५ लाख रूपयांपर्यंतही रक्कम जिंकू शकता. पण, एक्जिट पोल्सच्या अंदाजानूसार हा आकडा कमी होऊन तो ३ लाख रूपयांवर आला आहे. प्रसारमध्यमांतून आलेल्या आकडेवारीनुसार, सट्टा बाजारात भाजपसाठी १०० किंवा ११० जागांसाठी  प्रत्येक रूपयावर १.१ रूपये ते २ रूपयांचाही दर निघाला आहे. भारतात सट्टाबाजार बेकायदेशिर आहे. पण, हे एक अनौपचारीक मार्केट आहे. जे देशातील राजकारण, निवडणूक, स्पोर्ट्स इव्हेंट आणि तशाच मोठ्या घटनांवर कार्यरत होते.