How MMS And Private Video Leak From Device Know Reason Behind It: गेल्या काही दिवसात एमएमएस किंवा खासगी व्हिडीओ लीक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मोहालीच्या प्रायव्हेट युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर पुन्हा एकदा एमएमएसबाबत चर्चा सुरु झाली आहे. यामुळे खासगी व्हिडीओ (Private Video Leak) आणि एमएमएस लीक (MMS Leak) कसे होतात? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासगी व्हिडीओ किंवा एमएमएस लीक होण्याची अनेक कारणं आहेत. चला तर जाणून घेऊयात एमएमएस किंवा खासगी व्हिडीओ कसे लीक होतात?
सर्वात पहिलं म्हणजे काही व्हिडीओ जाणीवपूर्वक कोणत्यातरी वेबसाईटवर अपलोड केले जातात. खासकरून ब्रेकअप झाल्यानंतर असं कृत्य केलं जातं. त्यामुळे मीडियात याबाबत रिपोर्ट्स येतात. मात्र इतर कारणं तांत्रिक आहेत. थर्ड पार्टी अॅप्समुळे तुमचे व्हिडीओ लीक होतात. अॅप्स डाउनलोड करताना परमिशन मागतात आणि आपण नकळत अक्सेप्ट करतो आणि आपल्या डिव्हाईसचा अॅक्सेस मिळतो. अशा अॅप्सच्या माध्यमातून फाइल्सवर कमांड आणि कंट्रोल असतो आणि व्हिडीओ लीक होतो. त्यामुळे कोणतंही थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करण्यापूर्वी शहनिशा करून घ्या. तसेच परमिशन देताना काळजी घ्या.
दुसरं म्हणजे आपण आपला डिव्हाईस जुना झाला की विकतो. त्यामुळे आपल्या खासगी फाईल्स लीक होण्याची शक्यता असते. आपण फोनमधील डेटा फॉर्मेट करून दुसऱ्या व्यक्तीला विकतो पण अनेकदा डिलीट केलेल्या फाईल्स रिकव्हर केल्या जातात. त्यामुळे स्मार्टफोन विकताना फाईल्स डिलीट झाल्यात की नाही? हे तपासा.
Tips And Tricks: WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलंय, या सोप्या ट्रिकने शोधा
काही जण फोनचा बॅकअप ऑन ठेवतात. यामुळे फाइल्सचा बॅकअप इतर ड्राइव्हवर जातो. अनेक वेळा लोकांना अशा काही फाइल्स डाउनलोड कराव्या लागतात. त्यामुळे ड्राइव्हचा एक्सेस मिळतो. यासाठी तुम्हाला गुगल अॅक्टिव्हिटीवर जाऊन अज्ञात वेबसाइटला अॅक्सेस दिला की नाही हे तपासावे.