Rekha Jhunjhunwala Latest News : भारतीय शेअर मार्केटमध्ये झुनझुनवाला हे नाव कोणाल परिचित नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 15 दिवसात 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Rekha Jhunjhunwala Net Worth ) तसेच फोर्ब्सच्या 16 महिलांच्या यादीतील तीन महिलांमध्ये रेखा झुनझुनवाला यांचा समावेश आहे. त्यांनी प्रथमच अब्जाधीश महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल राकेश झुनझुनवाला यांना म्हटले जाते, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची एकून संपत्ती 5.1 अब्ज डॉलर आहे. राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्याचा व्यवसाय या पत्नी रेखा संभाळत आहेत. त्यांच्या कमाईचा आकडा हा वाढतच आहे. 15 दिवसात 1000 कोटी रुपयांची कमाई केल्याचे जोरदार चर्चा आहे.
रेखा झुनझुनवाला यांना त्यांच्या पतीकडून मजबूत स्टॉक पोर्टफोलिओ वारसा मिळाला आहे. पोर्टफोलिओमध्ये सर्वात शक्तिशाली शेअर होल्डिंग हे घड्याळ आणि ज्वेलरी निर्माता टायटनचे आहे. त्यांच्या मालकीच्या रेअर एंटरप्रायझेसची पहिली दोन अक्षरे राकेश झुनझुनवाला यांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांवरुन घेतली आहेत. रेखा झुनझुनवाला या 5.1 अब्ज डॉलर संपत्तीच्या मालकीन असून त्यांनी टायटन, टाटा मोटर्स आणि क्रिसलसह 29 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
रेखा झुनझुनवाला या त्यांना होणाऱ्या नफ्यामुळे चर्चेत होत्या. त्यांनी अवघ्या 15 दिवसांत तब्बल 1000 कोटींचा नफा कमावला. रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमधील हिस्सेदारी वाढवण्याचा निर्णय घेतला. रेखा झुनझुनवाला यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत 10.50 लाख शेअर्स खरेदी करुन टायटन कंपनीमध्ये आपला हिस्सा 0.12 टक्क्यांनी वाढवला. या दरम्यान टायटनचा शेअर 2460 रुपयांवरुन 2590 रुपयांपर्यंत वाढला, ज्यामुळे रेखा यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढत गेली.
रेखा दीर्घकाळ शेअर बाजारात काम करत आहेत. झुनझुनवाला कुटुंबाकडे दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये 4,500 चौरस फुटांचे डुप्लेक्स घर आहे. राकेश झुनझुनवाला यांनी 25.25 कोटींना खरेदी केले होते. तर लोणावळ्यात 18,000 स्क्वेअर फुटांचे 7 बेडरुम, एक पूल, जकूझी, जिम आणि एक डिस्को असणारा फार्म हाऊस घेतले आहे.