फ्लॅटच्या किंमती झाल्या कमी, जाणून घ्या घर खरेदीची योग्य वेळ

आधीच्या तिमाहीच्या तुलनेत फ्लॅट्सच्या किंमती ७ टक्क्यांनी स्वस्त झाल्या. 

Updated: Apr 19, 2018, 05:50 PM IST
फ्लॅटच्या किंमती झाल्या कमी, जाणून घ्या घर खरेदीची योग्य वेळ title=

नवी दिल्ली : देशातील प्रमुख नऊ शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत आधीच्या तिमाहीच्या तुलनेत फ्लॅट्सच्या किंमती ७ टक्क्यांनी स्वस्त झाल्या. घराची मागणी कमी राहिल्याने बांधकाम व्यावायिकांनी किंमती कमी केल्याचे रियल इस्टेट शोध आणि विश्लेशण कंपनी 'प्रॉपइक्विटी'ने सांगितले. 

मार्च तिमाहीमध्ये न विकल्या गेलेल्या फ्लॅटच्या किंमतीत घट होऊन ५ लाख ९५ हजार ७४ रुपयांनी कमी झाली. या आधीच्या तिमाहीत ६ लाख ८ हजार ९४९ होती.

घरांची विक्री वाढली 

तिमाहीमध्ये घरांची विक्री ८ टक्क्यांनी वाढून ४० हजार ६९४ रुपये युनिटवर पोहोचली. गेल्या तिमाहीत ही किंत ३७ हजार ५५५ युनिट इतकी होती. या रिपोर्टमध्ये मुंबई, गुरूग्राम, नोएडा, कोलकाता, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, ठाणे आणि चेन्नई या नऊ शहरांचा समावेश आहे. या तिमाहीत सरासरी किंमत ७ टक्क्यांनी घटून ६ हजार ७६२ रुपये प्रति स्के. फुटने घटत ६ हजार २६० रुपये प्रति स्के. फुट राहिली. नव्या घरांच्या किंमती वाढून १७ हजार ५५० युनिटने वाढत २५ हजार ९७० रुपये झाली.

स्वस्त घरे निर्माण करणार 

पहिल्या तिमाहीनंतर रिअॅलिटी बाजारात स्थिरता येण्यास सुरूवात होईल असे प्रॉपइक्विटीचे संस्थापक समीर जसूसा यांनी सांगितले. नव्या फ्लॅटच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक स्वस्त घरे तयार करत आहेत.

५ ते ७ लाखात फ्लॅट 

 देशातील प्रमुख शहारांच्या अनेक भागात घर खरेदी करण्याच्या चांगल्या संधी आहेत. केवळ ५ ते ७ लाख रुपयांत फ्लॅट आपल्यानावे करु शकता.फ्लॅट घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही योग्य वेळ आहे. यामध्ये गोंधळ किंवा धोका होण्याच्या शक्यता कमी आहेत. कारण या योजनांवर सरकारची नजर राहणार आहे. 

कुठे मिळतायत स्वस्त फ्लॅट ? 

 केवळ ५ ते ७ लाख रुपयात फ्लॅट खरेदी करता येणार आहे. पण दिल्लीच्या जवळपासच्या शहरात म्हणजेच एनसीआरच्या गुरूग्राम, फरीदाबाद,गाजियाबाद, ग्रेटर नोएडा, सोनीपत, राज्यस्थानचे अलवर, बहादुरगड,मेरठ या शहरांमध्ये अशाऑफर उपलब्ध आहेत.