मुंबई : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. जर कोणत्या एअरलाईन्सला उशीर झाला तर त्या कंपनीला त्याबदल्यात दंड भरावा लागणार आहे. डीजीसीएने प्रवाशांचा प्रश्न लक्षात घेता हा महत्वाचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. यामध्ये प्रवाशांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदारीचा विचार केला जाणार आहे. एअरलाइन्सच्या प्रवाशांमुळे कनेक्टिंग फ्लाइट सुटण्याच्या घटना आता रोजच्या झाल्या आहेत. यावर आता अंकुश असणं गरजेचं आहे.
डीजीसीएने मांडलेल्या प्रस्तावानुसार एअरलाईनने 20 हजार रुपयांपर्यंतचे भरपाई देण्यात येणार आहे. पहिल्यांदाच इतक्या रुपयांच्या भरपाईची प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याचा लाभ अशा प्रवाशांना मिळणार आहे ज्यांची फ्लाईक कॅन्सल झाल्यामुळे कनेक्टिंग फ्लाईट चुकणार आहे. नव्या आदेशानुसार, तिकीट असूनही प्रवास करू दिला नाही तर एअरलाईन्सला 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. अनेकदा फ्लाईट ओव्हरबुक असल्यास ग्राहकांना बोर्डिंगची परवानगी देखील दिली जात नाही.
फेडरेशन ऑफ इंडियन्स एअरलाइन्स आणि बाहेरच्या विमान कंपनीच्या विस्तार, एअर एशिया इंडियाने डीजीसीएने या प्रस्तावाचा विरोध केला आहे. त्यांच अस म्हणणं आहे की, यासाठी फक्त तेच जबाबदार नाहीत तर अनेकदा एअरपोर्ट अथॉरिटी आणि इतर कारणांमुळे फ्लाईटला उशीर होतो.