Hot Dog ने चहा पाजणाऱ्याच्या जीवनात क्रांती, कसं एका चवीने त्याला करोडपती बनवलं?

नशिबाची साथ असेल तर साधा चहावाला देखील करोडपती होऊ शकतो.   

Updated: Mar 15, 2021, 01:31 PM IST
Hot Dog ने चहा पाजणाऱ्याच्या जीवनात क्रांती,  कसं एका चवीने त्याला करोडपती बनवलं? title=

मध्य प्रदेश : जीवनात एखाद्या व्यक्तीसोबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. जर नशिबाची साथ असेल तर साधा चहावाला देखील करोडपती होऊ शकतो. असंच काही झालं आहे, मध्यप्रदेशच्या इंदौर शहरात राहणाऱ्या विजय सिंह राठोड यांच्या सोबत. राठोड हे आधी चहाच्या दुकानात कामाला होते. तेव्हा त्यांना आठ रूपये महिना मिळत असे. परंतु 'हॉट-डॉग (Hot Dog)' सारख्या ब्रांडने त्यांचं आयुष्य एका वेगळ्या थराला नेलं आहे. ते आज करोडपती आहे.  
 
नक्की काय आहे हॉट डॉग?
इंदौर शहरात एक खास डीश आहे. या डिशचं नाव जॉनी हॉट डॉग (Johny Hot Dog) असं आहे. ही डिश देशी  तूप आणि लोणीपासून तयार केली जाते. जॉनी हॉट डॉग विकत असलेल्या राठोड  यांना दादू नावाने ओळखलं जातं. जॉनी हॉट डॉग ही डिश ब्रेड रोल करून तयार कली जाते. 

सुरूवातीला जॉनी हॉट डॉग फक्त शाकाहरी मिळायचं पण आता मटन हॉट डॉग देखील मिळत आहे. जॉनी हॉट डॉग डिशने विजय सिंह राठोड यांना जगभरातून प्रसिद्धी मिळत आहे. महत्त्वाचं  म्हणजे  राठोड यांची ही  डिश सातासमुद्रा पार हाँगकाँगपर्यंत पोहोचली आहे. शिवाय जॉनी हॉट डॉग डिशला पुरस्कार देखील मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार  जॉनी हॉट डॉग डिशची सुरूवात 40 वर्षांआधी झाली. या डिशची सुरूवात स्टारलीट टॉकीजपासून झाली. विजय सिंह राठोड यांचे वडील शेतकरी आहेत.  माझ्या लहाणपणी याठिकाणी एक सिनेमागृह होता. या सिनेमागृहात फक्त इंग्रजी सिनेमे प्रदर्शित होत असल्याचं राठोड यांनी सांगितलं. 

सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये  हॉट डॉग विकले जायचे. पण काही कालावधीनंतर सिनेमागृह बंद झाला. त्यानंतर राठोड यांनी सिनेमागृहाच्या जागी जॉनी हॉट डॉग विकणं सुरू केलं. आताच्या घडीली ही  डिश चर्चेत आहे.