नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत. 2011 नंतर अण्णा केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने करणार आहेत. हे आंदोलन 2018मध्ये होणार असून, या आंदोलनात कोई केजरीवाल बनणार नाही, असेही अण्णांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णांनी माहिती दिली की, ते 23 मार्च 2018 पासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्रिसूत्रीय आंदोलन करणार आहेत. या वेळीही लोकपालांची नियुक्ती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि निवडणुक मतदान प्रक्रियेत सुधारणा याबाबत जागृकता निर्माण करणे हा या आंदोलनाच उद्देश असेन.
आपल्या आंदोलनाचा फायदा घेत राजकीय लाभ उठवणाऱ्या काही मंडळी अण्णांच्या चांगल्याच रडारावर आहेत. 2011 आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व निर्माण झाले. पुढे केजरीवाल यांचा अण्णांच्या आंदोलनाशी फारसा संबंध राहिला नाही. त्यामुळे अण्णांनी या वेळच्या आंदोलनात सावध पावले टाकली आहेत. अण्णांनी म्हटले आहे की, आपल्या आंदोलनात सहभागी होणारा किंवा आंदोलनाला पाठिंबा देणारा कोणताही कार्यकर्ता हा राजकीय निवडणूक लढणार नाही. तसे, त्याने स्टॅंप पेपरवर लिहून द्यावे लागणार आहे.
जीएसटी आणि नोटबंदीच्या मुद्द्यावरून बोलताना अण्णा म्हणाले, बॅंकांचा 99 टक्के पैसा जमा झाला आहे. तर, मग काळा पैसा गेला कोठे. अण्णांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. अण्णांनी म्हटले आहे, मोदींनी अश्वासन दिले होते की, सत्तेवर येताच 30 दिवसांत काळा पैसा देशात आणेन. तसेच, प्रत्येक व्यक्तिच्या बँक खात्यावर 15-15 लाख रूपये असतील. पण, सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली 15 रूपयेही आले नाहीत, असेही अण्णांनी म्हटले आहे.